निलंगा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) सर्वसमावेशक व समतोल विकासामध्ये साथ देण्यासाठी निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला जात आहे. आज काँग्रेसचे माजी सभापती गोविंदराव शिंगाडे (Govindrao Shingade) आणि अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन शेषेराव कांबळे या दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अमरावतीतील तीर्थस्थानांचा चेहरा-मोहरा बदलणार; यशोमती ठाकूर यांची ग्वाही
माजी खासदार रूपाताई अक्का पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांसह गोविंदराव शिंगाडे, शेषेराव कांबळे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सोबत भाजपात प्रवेश केलेले कार्यकर्ते रवी जाधव, कृष्णा जाधव, राहुल जाधव, अनिल जाधव, पंढरी पवार, गोविंद सुभेदार, सुनील काळे, संतोष माळेगाव, खंडू सूर्यवंशी, सुभाष तेलंग, विजयकुमार देवगुंडे, पांडुरंग जाधव, काशिनाथराव बापू, अभिषेक राम जाधव, गजानन जाधव, बसवराज कलशेट्टी, रवींद्र सूर्यवंशी, संतोष पोतदार, रितेश महादेव एलके, मोहम्मद शेख , दत्ता मुळे, रविकांत तेलंग, बबन एलके, विष्णू माने, जगन्नाथ कांबळे, विठ्ठल वाघमारे, सतीश तेलंग, बालाजी तेलंग, दत्ता जाधव, कृष्णकांत वाघमारे, किशोर गवळी, ज्ञानेश्वर तेलंग, विठ्ठल तेलंग, नितेश जाधव, परमेश्वर ढवरे, पांडुरंग देवगुंडे, सोनू शिंगाडे, किरण वाघमारे, विष्णू अंतर रेड्डी, तानाजी विभुते, दत्ता महाराज, परमेश्वर विभुते, आकाश विभुते, हर्षवर्धन शिंगाडे, महेश कलशेट्टी उपस्थित होते.
Anuradha Nagawade : ‘मशाली’ च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार
गोविंदराव शिंगाडे कर्मयोगी डॉ. दादासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते…
माजी सभापती गोविंदराव शिंगाडे हे कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अतिशय विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गोविंदराव शिंगाडे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. पेठ आणि शहरावर चांगली पकड असलेला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच समाजात त्यांची एक वेगळी ओळख आहे. जनतेच्या कसल्याही अडीअडचणींना धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी कर्मयोगी डॉ. निलंगेकर यांना शेवटपर्यंत साथ दिली. यांच्यासोबत त्यांच्या भरभराटीच्या काळात आणि त्यांच्या पडत्या काळात देखील निलंगेकर यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली आहे. तसेच त्यांची सामान्य माणसासोबत नाळ जोडलेली असल्यानं जनतेतला कार्यकर्ता म्हणून गोविंदराव शिंगाडे यांची ओळख आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसच्या शिंगाडे यांनी पक्ष प्रवेश केल्यानं त्यांचा पक्ष प्रवेश भाजपसाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे.