Download App

निलंगा येथे उद्या महायुतीची आशीर्वाद सभा; हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज

आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक आणि मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

  • Written By: Last Updated:

निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील (Nilanga Assembly Constituency) भाजप (BJP) महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेक (Sambhajirao Patil Nilangekar) मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक आणि मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जेष्ठ नेते भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आशीर्वाद सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.

सस्पेन्स संपला! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवाराची घोषणा

या ऐतिहासिक सभेसाठी तीनही तालुक्यातील भजनी मंडळे, गणेश मंडळे, आराधी मंडळे, वारकरी आणि दुर्गा मंडळे तसेच नागरिक आणि मतदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपसह महायुतीतील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो युवक-युवती आणि मतदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आ. निलंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निलंगेकर यांनी संपूर्ण मतदारसंघाचे दौरे करून नागरिकांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेतला आहे. विविध गावात जन आशीर्वाद सभा, नागरिक व मतदारांचे मेळावे, महिला मेळावे, बचत गटांच्या महिलांचे मेळावे, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवादाचे कार्यक्रम, व्यापारी, वकील तसेच विविध समाज घटकांसोबत बैठका झालेल्या आहेत.

तुम्ही कोणत्या मतदारसंघातून लढणार? जरांगे म्हणाले, ‘माझ्यासाठी मतदारसंघच…’ 

मागील काळात राबविलेल्या विविध विकासकामांची लोकार्पणे आणि मंजूर झालेल्या योजनांची भूमिपूजने झाली आहेत. वाडी – तांड्यावरील प्रत्येकाचे मत जाणून घेत आगामी कार्यकाळात राबवावयाच्या विकास योजनांचा आराखडा आ. निलंगेकर यांनी तयार केलेला आहे. विकास कामांची गती कायम राखत निलंगा मतदार संघाला नव्या उंचीवर पोचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्याचा समावेश असणाऱ्या निलंगा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. जनतेच्या आशीर्वादानेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. जनतेने आजपर्यंत अपार प्रेम केले आहे. प्रत्येक कार्यात साथ दिली आहे. यावेळीही पुन्हा एकदा आपली साथ आणि सहकार्य तसेच आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत आपण जो विश्वास दाखवला त्या बळावरच ही वाटचाल सुरू असून मंगळवारी होणाऱ्या आशीर्वाद सभेस आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

follow us