Download App

Vidhansabha Election : आता युध्द अटळ, आम्ही लढणार, पाडणार अन् जिरवणारच; जरांगेंचा इशारा

येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडणार, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आता लढणार, पाडणार, जिरवणार असा इशारा जरांगेंनी दिला.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : विधानसभेला (Vidhansabha Election) ज्या ठिकाणी विजयी होणार तिथं उमेदवार द्यायचा अन् जिथं उमेदवार देता येत नाही, तिथे पाडापाडी करायची, अशी भूमिका का मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली. त्यानंतर आज त्यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टीका केली. येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडणार, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आता लढणार, पाडणार, जिरवणार असा इशारा जरांगेंनी दिला.

मोठी बातमी! काँग्रेसच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ; उद्धव ठाकरेंचा ‘प्लॅन बी’ काय? 

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनाचा मतदानावर मोठा परिणाम झाला. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन केलं. मात्र, अद्यापही आरक्षणाचा प्रश्न  सुटला नाही. आचारसंहिता लागेपर्यंत महायुती सरकारने जरांगे पाटील यांना अपेक्षित निर्णय दिलेला नाही.

दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. आज माध्यमांशी ते म्हणाले, येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडपणार याबाबत निर्णय घेऊ आणि जाहीर करू, अशी जरांगे पाटील यांनी केली.

‘जिगरा’च्या प्रमोशनसाठी वेदांग रैनाची अनोखी शैली; सर्वोत्कृष्ट लुक्सनी वेधलं चाहत्यांचं लक्ष 

ते म्हणाले, राज्य सरकारला संधी दिली होती, मात्र त्यांनी संधीचं सोन केलं नाही, आता युध्द अटळ आहे. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, मात्र, समाजाची इच्छा होती. त्यामुळं मला त्याचं ऐकावलं लागतं. आता लढणार, पाडणार, जिरवणार अशी घोषणाच जरांगे पाटील यांनी दिली.

आता युध्द अटळ
आता युध्द अटळ आहे. आम्ही कोणत्याही पक्षाला टार्गेट करत नसून देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिऊ दिलं नाही, हे खंर आहे. एकनाथ शिंदे यांचे नुकसान होईल की नाही याचा विचार दोन दिवसांनी करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

जरांगेंनी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही पक्षाला टार्गेट करत नाही. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही चाबरे आहेत. त्यांच्या याद्या दिल्लीतून येतात, आता ते आपण काय निर्णय घेतो, याची हे वाट पाहत आहेत, असं जरांगे म्हणाले.

जरांगे पाटील यांनी मोजक्या लोकांनी अर्ज भरावे, जास्त लोकांनी अर्ज भरू नये. अन्यथा माघार घेताना गोंधळ होईल, असं आवाहनही केलं.

follow us