Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण तरुणांना रोजगार देखील मिळणार आहे.
अयोध्येत अत्यावश्यक सुविधांवर भर
अयोध्येतील राम मंदिर हे देशातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र ठरणार आहे. रामजन्मभूमी करोडो भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा अनेक पिढ्यांपासून होती. अशा परिस्थितीत आगामी काळात अयोध्या हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनणार आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे. यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. FMCG आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील कंपन्यांनी ही संधी हेरली आहे. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची संख्या झपाट्याने वाढेल आणि विविध उत्पादनांचा खपही वाढेल.
अयोध्येत पर्यटकांची संख्या वाढणार
राम मंदिराच्या निर्मितीमुळे अयोध्येतील पर्यटन 8-10 पटीने वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असणार आहे. यामुळे अनेक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
ठाकरेंसमोर मिलिंद देवरांचं आव्हान! चर्चेआधीच दक्षिण मुंबईवर दावा केल्यास कॉंग्रेसही दावा करेल अन्…
अयोध्येतील पर्यटनाची आकडेवारी काय सांगते?
OYO कंपनीने दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच हॉटेल्सच्या बुकिंगमध्ये 70-80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये अयोध्येला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 3 लाख 25 हजार होती तर 2022 मध्ये 85 पटीने वाढून 2 कोटी 39 लाख झाली होती. आता मंदिर बांधल्यानंतर त्यात 8-10 पट वाढ होऊ शकते. म्हणजेच दरवर्षी 20-25 कोटी पर्यटक अयोध्येत येण्याचा अंदाज आहे. हा आकडा अयोध्याला जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनवेल.
या कंपन्या अयोध्येत येण्याच्या तयारीत?
मीजियाच्या रिपोर्टनुसार, मिनरल वॉटर कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल अयोध्येत आपला प्लांट उभारत आहे. ही कंपनी आगामी काळात बाटलीबंद पाणी, शीतपेये, स्नॅक्स आणि ग्रॉसरीचे उत्पादन वाढवणार आहे.
IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’; गोलंदाजीमध्ये मोठे बदल
बिस्किटे आणि इतर FMCG उत्पादने बनवणारी पार्ले कंपनी आपल्या प्रॉडक्ट्ससाठी अयोध्या आणि आसपास डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क तयार करत आहे. तसेच अयोध्या-लखनौ महामार्गावर मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंगची ब्रांच सुरू झाली आहे. अयोध्येतील राम मंदिर हे श्रद्धेसोबत हजारो लोकांना रोजगार देणार आहे. आणखी कोणत्या क्षेत्रातून अयोध्येत रोजगार निर्माण होईल.