ठाकरेंसमोर मिलिंद देवरांचं आव्हान! चर्चेआधीच दक्षिण मुंबईवर दावा केल्यास कॉंग्रेसही दावा करेल अन्…

ठाकरेंसमोर मिलिंद देवरांचं आव्हान! चर्चेआधीच दक्षिण मुंबईवर दावा केल्यास कॉंग्रेसही दावा करेल अन्…

Milind Deora : यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहे. जागावाटपावरून दावे-प्रतिदावे सुरू आहे. अशातच काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचीक्षिण मुंबईत सभा झाली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यासाठी मैदान उतरले. दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाने दावा केल्यास कॉंग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असा इशारा देवरा यांनी दिला.

‘शरद पवारांनी काळजी घेतली असती तर आज..,’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

ठाकरे गटाने दक्षिण मुंबई मतदार संघावर दावा ठोकला आहे. त्यावर बोलतांना मिलिंद देवरा म्हणाले, सकाळपासून माझे मतदार, कार्यकर्ते आणि समर्थक मला फोन करत आहेत. मला वाद घालायचा नाही. मात्र, महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेवर एकतर्फी दावा करत असल्याने तुमची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. मला कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही. गेल्या आठवड्यात त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरूवात करायला सांगितली.

तलाठी भरतीचा खेळखंडोबा! तुम्ही पुरावे द्या, मी चौकशी करतो; फडणवीसांचं खुलं चॅलेंज 

ते म्हणाले, गिरगावातील कालच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला. मात्र, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसकडे असून देवरा कुटुंबीय या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. खासदार असो वा नसो, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जनतेची कामे केली आहेत. आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलो नाही. काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे, असंही देवरा म्हणाले.

मिलिंद देवरा म्हणाले, लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी सोपी होणार नाही. त्यामुळं कोणीही सार्वजनिक विधाने किंवा दावे करू नयेत. जर एखादा पक्ष औपचारिक चर्चेपूर्वीच असे दावे करत असेल तर कॉंग्रेस देखील जागांवर दावा करू शकते आणि उमेदवार देऊ शकते. मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल.

मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव होता. या भागातील उद्योगपतींशीही त्यांचे विशेष संबंध होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मिलिंद देवरा यांनीही मतदारसंघ बांधला. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत देवरा यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून अल्पशा फरकाने पराभव झाला होता. सध्या अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटासोबत राहिले. त्यामुळे ही जागा सध्या ठाकरेंच्या ताब्यात आहे. त्यामुळं ठाकरे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube