Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेवेळी राम गीतांनी दुमदुमला गाभारा, भक्तीमय वातावरणात विराजमान झाले प्रभू श्रीराम

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराची (Ram Mandir) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज पवित्र मंत्रांचा ध्वनी… शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह आज प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशानं भरून […]

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेवेळी राम गीतांनी दुमदुमला गाभारा, भक्तीमय वातावरणात विराजमान झाले श्रीराम

Ram Mandir Pratishtha

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराची (Ram Mandir) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज पवित्र मंत्रांचा ध्वनी… शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह आज प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशानं भरून पाहिला. प्राणप्रतिष्ठेवळी गर्भगृहात रामनामाची स्तुतीसुमने सुरू होती. अनेक भजणं आणि गाणी सादर कऱण्यात आली. त्यामुळं हा सोहळा द्विगुणित झाला.

Ram Mandir Ayodhya: पाऊले चालती अयोध्येची वाट! कंगणाने घेतली बाबाची भेट, पाहा फोटो 

गणेशपुजनाननं प्राणप्रतिष्ठा सोगळ्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही गर्भगृहात उपस्थित होते. यावेळी गर्भगृहात तुतारी अन् वाजंत्रीवर रामाची अनेक गाणी वाजवली. बाबुजी मेरे राम लखन आयो, रघुपती राघव राजाराम…राम आयेंगे… सीताराम भज प्यारे तू सीताराम यासह अनेक गाणी वाजवण्यात आली. त्यामुळं गर्भगृहासह हा मंदिर परिसर राममय झाला होता. भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेआधीही गायकांनी प्रसिध्द रामगीते गायली आहे.

प्राणप्रतिष्ठेवेळई श्रीरामाच्या मूर्तीची झलक पाहिल्यानंतर गर्भगृहातील अनेकांना कृतकृत्य झाल्याच्या भावना झाला होत्या. याचि देही याची डोळा, देखीला ऐसा सोहळा अशा उपस्थितांच्या भावना होत्या. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. सर्वजण रामभक्तीत तल्लीन झाले होते. सोबतच राम गीतांचे गायन सुरू असल्यानं वातावरण आणखीनच भक्तीमय झालं होतं.

हृतिक-दीपिकाच्या ‘फाइटर’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 2.84 कोटींची कमाई 

दरम्यान, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्यानं देशभरातील कोट्यवधी भाविकांनी घरबसल्या प्रभू रामाचे दर्शन घेतले. दरम्यान, हा सोहळा दिवसभर सुरू राहणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. उत्सवाच्या समाप्तीनंतर, राम मंदिर बुधवार 24 जानेवारीपासून सर्व राम भक्तांसाठी खुले होईल.

मूर्तीची वैशिष्ट्ये?
गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, ती सावळ्या रंगाची आहे. ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरूप आहे. कर्नाटकच्या अरुण योगीराज यांनी रामलल्लाची मूर्ती बनवली. ही मूर्ती दागिन्यांनी सजवण्यात आली आहे. प्रभू रामचंद्राच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. कपाळावर सोन्याचा तिलक लावलेला आहे.

Exit mobile version