राम मंदिराची सीआरपीएफ सुरक्षा हटविणार ! यूपीच्या खास ‘फोर्स’वर आता जबाबदारी

  • Written By: Published:
राम मंदिराची सीआरपीएफ सुरक्षा हटविणार ! यूपीच्या खास ‘फोर्स’वर आता जबाबदारी

Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराचे (Ram Mandir) काम वेगाने सुरू आहे. मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीखही ठरली आहे. 22 जानेवारी 2024 ला मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच राम मंदिराच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर परिसराची सुरक्षा सीआरपीएफकडे होती. ही सुरक्षा आता हटविण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून सीआरपीएफकडे मंदिराची सुरक्षा व्यवस्था होती. आता उत्तर प्रदेशच्या एसएसएफ (स्पेशल सिक्युरिटी फोर्स) जवानांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. अयोध्याचे पोलिस आयुक्त गौरव दयाल यांनीही माहिती दिली.

अयोध्यामध्ये राम जन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. त्या बैठकीबाबत अयोध्याचे पोलिस आयुक्त गौरव दयाल म्हणाले, राम जन्मभूमीची सुरक्षा आता यूपी एसएसएफच्या (उत्तर प्रदेश स्पेशल सिक्युरिटी फोर्स) जवानांकडे देण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जागी एसएसएफची जवान तैनात करण्यात येणार आहे. एसएसएफचे जवान अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. या जवानांना एक आठवडा विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एसएसएफबरोबर पोलिसही तैनात करण्यात येणार आहे.

Tharman Shanmugarratnam : सिंगापूरमध्ये भारतीय वंशांचे राष्ट्राध्यक्ष, थर्मन षण्मुगररत्नम यांनी घेतली शपथ

दयाल म्हणाले, 16 ते 23 जानेवारी दरम्यान राम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिरातील काही भागाचे काम पूर्ण होत आहे आहेत. आतापर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. अन्य कामेही लवकरच पूर्ण होतील. या दरम्यान राम जन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक झाली. परंसु यूपी एसएसएफला सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी कधी मिळणार आहे. याबाबत गौरव दयाल यांनी माहिती दिलेली नाही.

सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी अन्…; INDIA आघाडीने बहिष्कार घातलेल्या 14 अँकरची नावे जाहीर

राम जन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्याला होत असते. दोन दिवसांपूर्वी अयोध्यात आलेल्या एसएसएफ जवानांचा मोठा उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

अयोध्यामध्ये प्रशासनाची जोरदार तयारी

राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे येथील जयारीसाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा व सुरक्षेसाठी तयारी करत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती येणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube