सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी अन्…; INDIA आघाडीने बहिष्कार घातलेल्या 14 अँकरची नावे जाहीर

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 14T170933.530

नवी दिल्ली : मोदींविरोधात मोट बांधलेल्या इंडिया आघाडीने (India Alliance ) देशातील चार टीव्ही वृत्तवाहिन्या आणि 14 टीव्ही न्यूज अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल (दि.13) पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज बहिष्कार घातलेल्या न्यूज अँकर्सची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या चॅनल्स आणि अँकर्सने वास्तविक समस्यांपासून देशाला विचलित केल्याचे सांगत बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे कारण देण्यात आले आहे. (India Alliance Boycott 14 News Channel Anchors)

बहिष्कार घातलेले अँकर्स कोण?

इंडिया आघाडीकडून बहिष्कार घालण्यात आलेल्या 14 अँकर्समध्ये अमन चोपड़ा (न्यूज़ 18), अमीश देवगन (न्यूज़ 18), अदिती त्यागी (भारत एक्सप्रेस), चित्रा त्रिपाठी (आज तक), रुबिका लियाकत (भारत 24), गौरव सावंत (इंडिया टुडे), प्राची पाराशर (इंडिया टीवी), आनंद नरसिम्हन (न्यूज़ 18), सुशांत सिन्हा (टाइम्स नाऊ नवभारत), शिव अरूर (इंडिया टुडे), सुधीर चौधरी (आज तक), अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज़), नाविका कुमार (टाइम्स नाऊ), अर्णब गोस्वामी (रिपब्लिक भारत) या टिव्ही न्यूज अँकर्सचा समावेश आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीने बहिष्कार टाकलेल्या यादीवर आज तकचे पत्रकार सुधीर चौधरी यांनी ट्विटरवर उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, I.N.D.I.A आघाडीने ‘चरण चुंबक’ बनण्यास नकार देणाऱ्या पत्रकारांची यादी जाहीर केली आहे. आता देशातील मीडिया यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आज तक या हिंदी न्यूज चॅलनवर आयोजित कार्यक्रमात जातीय सलोखा बिघडवण्याचा कट रचल्याबद्दल कर्नाटक पोलिसांनी अँकर सुधीर चौधरी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्याच्या एका दिवसानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

Tags

follow us