Download App

राम मंदिराचा मॅप आला समोर! 70 एकरच्या एरियात भक्तांना मिळणार ‘या’ सुविधा; सचिवांनी दिली माहिती

  • Written By: Last Updated:

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील विशाल राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Shri Ram Chandra) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, हे मंदिर कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जेमतेम महिना शिल्लक असताना, राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या 70 एकर परिसराचा नकाशा सादरला केला. हे मंदिर अयोध्या नगरपालिकेवर ओझे बनणार नाही, असे अयोध्या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

‘धक धक गर्ल’ राजकारणात? खुद्द माधुरीचाच चर्चेला फुलस्टॉप; म्हणाली, ‘माझी आवड राजकारण..,’ 

चंपत राय यांनी व्हिडिओद्वारे संपूर्ण मंदिराचा नकाशा सादर केला. त्यांनी सांगितले की, हे मंदिर उत्तरेकडील 70 एकर जागेवर बांधले जात आहे. हे तीन मजली मंदिर आहे. सध्या मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

पत्रकारांशी संवाद साधताना राय यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही आणि पाया बांधणीतही काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही. चारशे फूट लांब आणि तीनशे फूट रुंद अशा विशाल भूभागावर जाड रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीटचा 14 मीटर जाडीचा कृत्रिम खडक टाकून मंदिराचा पाया तयार करण्यात आला आहे. मंदिराचा माथा 380 फूट लांब व 250 फूट रुंद असून मंदिराच्या मुख्य शिखराची उंची 161 फूट आहे. मंदिराचा गाभारा पांढऱ्याा संगमरवरी दगडाने बांधण्यात आला. मंदिराच्या प्रत्येक भागात सुरेख-सुंदर नक्षीकाम पाहायला मिळेल, असं ते म्हणाले.

अजित पवारांच्या गटाविरोधात भाजप-शिवसेना एकवटले; 800 कोटींच्या निधीवरुन घेतला पंगा 

1.मंदिरात संमेलन, प्रार्थना आणि कीर्तने यासाठी पाच मंडप असतील. मंदिरात प्रवेश पूर्वेकडून असेल आणि दक्षिणेकडून भाविक बाहेर पडलीत.

2. मुख्य मंदिरात जाण्यासाठी पर्यटकांना पूर्वेकडील 32 पायऱ्या चढून जावे लागेल.

3. मंदिर परिसर पारंपारिक नागारा शैलीत बांधला गेला आहे. 250 फूट रुंद आणि 161 फूट हे मंदिर आहे. मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच असेल आणि त्याला एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील.

4. सामान्यतः उत्तरेकडील मंदिरांमध्ये पर्कोटा नसतो. पण राम मंदिरात 14 फूट रुंद आणि 732 मीटरचा पर्कोटा असेल.

5. ‘पर्कोटा’ चे चार कोपरे सूर्यदेव, माँ भगवती, भगवान गणेश आणि भगवान शिव यांना समर्पित केले जातील. मंदिराच्या उत्तरेला माँ अन्नपूर्णेचे मंदिर असेल आणि दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर असेल.

6. महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषाद राज, माता शबरी आणि देवी अहिल्या या प्रत्येकाला समर्पित तीर्थस्थाने असतील. अयोध्येतील कुबेर टिळा येथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली.

7. मंदिर संकुलात, तीर्थयात्रींसाठी आरोग्य सेवा केंद्र आणि टॉयलेट ब्लॉकसह विविध सुविधा असतील. 25,000 लोक दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्यांचे शूज, घड्याळे आणि मोबाईल फोन जमा करू शकतील अशी व्यवस्था कऱण्यात येणार आहे.

8. उन्हाळ्यात, दर्शनार्थ्यांना सुविधा केंद्रापासून मंदिरापर्यंत अनवाणी पायी चालावे लागणार नाही, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.

9. मंदिर परिसराच्या 70 एकरांपैकी सुमारे 70% क्षेत्र हिरवेगार असेल. शंभर वर्षांहून जुनी झाडे आहेत. इतके घनदाट जंगल आहे की सूर्यकिरण जमिनीवर पोहोचत नाही, असे राय म्हणाले.

दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्सा संत परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्वपूर्ण योगदार देणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित केले आहे.

follow us