Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ म्हटलं जातं. मात्र ही टाईम कॅप्सूल काय आहे? ती राम मंदिराच्या खोलवर ठेवण्याचं कारण काय? जाणून घेऊ सविस्तर…
सुरुवातीला पाहूयात टाईम कॅप्सूल म्हणजे काय?
ही टाईम कॅप्सूल अशा विशिष्ट घटकांपासून बनलेले असते. ज्यावर ऊन, वारा, पाऊस वातावरणातील कोणत्याही बदलाचा परिणाम होत नाही. जमिनीच्या आत खोलवर ती गाडली जाते. त्यानंतर वर्षानुवर्षे तशीच असते. इतिहासाचे जतन करण्यासाठी यामध्ये विशिष्ट माहिती लिहून ठेवली जाते. जेणेकरून भविष्यात तिचा उपयोग होईल.
Nashik News : नाशिक पोलिसांनी नंबर दिला मदतीसाठी.. पण प्रत्यक्षात काय घडलं?
आता पाहूयात टाईम कॅप्सूल अशा प्रकारे जमिनीत खोलवर गाडून ठेवल्याने काय होते?
टाईम कॅप्सूल अशा प्रकारे खोलवर जमिनीत काढून ठेवल्याने महत्त्वाचे म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना, समाजाला युगाला देशाचा इतिहास माहिती व्हावा यासाठी त्याचे जतन केलं जातं. जेणेकरून भविष्यात दुर्दैवाने ही वास्तु नैसर्गिक आपत्तीमध्ये नष्ट झाली. तरी देखील उत्खनन केल्यानंतर त्या संदर्भातील माहिती मिळू शकते.
‘भारत न्याय यात्रा’ मोदींना जड जाणार? भाजपच्या मुळावरच घाव घालण्याचा राहुल गांधींचा ‘प्लॅन’
तर तुम्हाला प्रश्न पडला असेल राम मंदिराच्या खाली ही टाईम कॅप्सूल का ठेवण्यात आली?
तर गेल्या कित्येक दशकांपासून अयोध्या हीच प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आहे. हे सिद्ध करण्यासाठी तसेच राम मंदिर निर्माणापर्यंत जो काही संघर्ष करावा लागला आहे. तो पाहता भविष्यात दुर्दैवाने या वास्तूला नैसर्गिक किंवा मानवनिर्मित रित्या काही हानी पोहोचली. तरी देखील उत्खननानंतर आगामी पिढ्यांना या टाइम कॅप्सूलच्या माध्यमातून राम मंदिराचा योग्य आणि खरा इतिहास माहिती होईल.
तर राम मंदिराच्या खाली गाडण्यात आलेल्या कॅप्सूलमध्ये तांब्याच्या प्लेटवर मंदिराचा संक्षिप्त इतिहास, स्थापना तिथी, भूमिपूजन करणारे मुख्य अतिथी, उपस्थित असणारे लोक, त्याचबरोबर मंदिर कोणत्या शैलीमध्ये निर्माण केले आहे? ते कोणी निर्माण केले आहे? या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.