120 Bahadur Movie Released on 21 November 2025 : पोस्टरच्या थरारक अनावरणानंतर अवघ्या एका (Entertainment News) दिवसात, एक्सेल एंटरटेन्मेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजने आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘120 बहादुर’ चा टीझर (120 Bahadur Movie) प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा जागवणारा असून, त्यात युद्धातील शौर्य, भावना आणि आत्मबलिदान (Bollywood) यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.
या टीझरमध्ये *फरहान अख्तर मेजर शैतान सिंह भाटी (पी.व्ही.सी.) यांच्या प्रभावी भूमिकेत दिसत असून, त्यांच्या नव्या रुपाने प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळतो. पहिल्याच झलकितून हे स्पष्ट होते की हा चित्रपट भारताच्या इतिहासातील एक अभिमानास्पद पान पुन्हा जिवंत करणार आहे.
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयात सरकार पक्षकार होणार, महादेवीला पुन्हा आणण्यासाठी मोठा निर्णय
चित्रपट 1962 धील रेझांग ला येथील खऱ्या युद्धावर आधारित आहे, जिथे फक्त 120 भारतीय जवानांनी हजारो शत्रूंचा मुकाबला करत इतिहास रचला. टीझरमध्ये सतत ऐकू येणारी एक प्रभावी ओळ, आम्ही मागे हटणार नाही! ही चित्रपटाच्या मूळ आत्म्याचे दर्शन घडवते. फरहान अख्तरचा गंभीर, समंजस आणि हृदयस्पर्शी अभिनय मेजर शैतान सिंह यांच्या रूपात विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या अभिनयातील शांत ताकद आणि वास्तवदर्शी शैलीला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे.
मोठी बातमी! UAN बाबतीत EPFO ने घेतला मोठा निर्णय; पहिल्या जॉबसोबत ‘या’ कामाकडे दुर्लक्ष नको
लडाख, राजस्थान आणि मुंबई येथे चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट युद्धभूमीची थरारक अनुभूती देतो. बर्फाच्छादित प्रदेशांपासून रणभूमीच्या शांततेपर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये सखोलता आणि वास्तवदर्शिता आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजनीश ‘रेझी’ घोष यांनी केले असून, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेन्मेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘120 बहादुर’ 21 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.