Download App

69 th National Film Awards मध्ये सरदार उधम सिंहचा बोलबाला; ‘या’ 5 कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त

69 th National Film Awards: आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुजित सरकार यांच्या सरदार उधम सिंह चित्रपटाचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळालं. कारण चित्रपटाला पाच कॅटेगिरी मध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

‘या’ 5 कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्र चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन. या पाच कॅटेगिरीतील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रपटाचे हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि कीनो वर्क्सचे शील कुमार, त्याचबरोबर साऊंड डिझायनर सीनोल जोसेफ, प्रोडक्शन डिझायनर मानसिक रूप मेहता आणि कॉस्ट्यूम डिझायनर वीरा कपूर यांनी हजेरी लावली होती.

‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी अन् एशियन गेम्समध्ये मेडल ‘0’ : गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका

दरम्यान सरदार उदमसिंह हा चित्रपट सुजित सरकारी यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट देशभक्तीपर चित्रपट आहे. जो स्वातंत्र्य सैनिक उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात उधमसिंग यांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली आहे. या चित्रपटाचा प्रेक्षकांसह समीक्षकांनी देखील भरभरून कौतुक केलं होतं.

मीरा बोरवणकरांच्या आरोपामागे भाजपचा हात? रोहित पवारांचा मोठा आरोप

तर रायझिंग सन फिल्म यांच्याकडून नेहमीच वैविध्यपूर्ण अशा विषयांवर चित्रपट निर्मिती केली जाते त्याचबरोबर त्यांच्या इतर अनेक चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये विकी डोनर मद्रास कॅफे पिंक आणि पिकू या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. त्यामुळे रायझिंग सनफिल्स यांच्या चित्रपटांमुळे गेल्या दशकभरामध्ये भारतीय चित्रपट चित्रपटांना एक नवा आयाम मिळाला आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर या चित्रपटाच्या टीमचे सध्या सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Tags

follow us