चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोवाने जिंकला 71st Miss World चा किताब; भारताच्या सिनी शेट्टीचं स्वप्नभंग

71st Miss World : अखेर जगभरातील फॅशन विश्वातील चाहत्यांना ज्याची आतुरता होती. त्या 71 व्या मिस वर्ल्डचे ( 71st Miss World) नाव अखेर समोर आले आहे. यंदाच्या 71 व्या मिस वर्ल्डचा किताब चेक रिपब्लिक या राष्ट्राची क्रिस्टीना पिजकोवा ( Krystyna Pyszkova ) या सुंदरीच्या नावावर झाला आहे. तर लेबनान या राष्ट्राची यास्मिना या स्पर्धेची रनरअप […]

चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोवाने जिंकला 71st Miss World चा किताब; भारताच्या सिनी शेट्टीचा स्वप्नभंग

71st Miss World

71st Miss World : अखेर जगभरातील फॅशन विश्वातील चाहत्यांना ज्याची आतुरता होती. त्या 71 व्या मिस वर्ल्डचे ( 71st Miss World) नाव अखेर समोर आले आहे. यंदाच्या 71 व्या मिस वर्ल्डचा किताब चेक रिपब्लिक या राष्ट्राची क्रिस्टीना पिजकोवा ( Krystyna Pyszkova ) या सुंदरीच्या नावावर झाला आहे. तर लेबनान या राष्ट्राची यास्मिना या स्पर्धेची रनरअप राहिली.

Udhhav Thackeray यांचा शिंदे गटावर मोठा डाव; कीर्तीकरांच्या उत्तर पश्चिममध्ये मुलगा अमोलला उमेदवारी जाहीर

मिस वर्ल्ड या स्पर्धेच्या फिनालेचं आयोजन 9 मार्चला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. यंदा या स्पर्धेमध्ये 120 सुंदरींनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मागे सोडत क्रिस्टीनाने हा किताब आपल्या नावावर केला. गेल्यावेळी पोलंडची कॅरोलिना बिलावस्का ही या स्पर्धेची विजेती होती. तिनेच यावेळी क्रिस्टीना पिजकोवाला हा मुकुट घातला.

कोण तो रवींद्र चव्हाण? दापोलीत येऊन…; रामदास कदमांनी डागले पुन्हा टीकास्त्र

तर भारताकडून या स्पर्धेमध्ये सिनी शेट्टीने सहभाग घेतला होता. मात्र तिचं विजेतेपदाचे स्वप्न भंगलं आहे. या स्पर्धेत टॉप आठपर्यंत स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली. मात्र टॉप चार स्पर्धकांची निवड झाली. त्यामध्ये ती स्थान मिळवू शकली नाही. तेथेच ते स्पर्धेतून बाहेर पडली. सिनी ही मूळची कर्नाटकातील आहे. मात्र तिचे शिक्षण मुंबईत झाले. सिनीने या अगोदर 2022 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकलेला आहे.

या इव्हेंटबद्दल सांगायचं झालं तर बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी इव्हेंटला होस्ट केलं होतं. तसेच 2013 चा मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी मेगान यंग ही देखील यावेळी करण जोहरसोबत होस्टिंग करत होती. तर गायिका नेहा कक्कड त्याचा भाऊ टोनी कक्कड आणि शान यासारख्या प्रसिद्ध गायकांनी या इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स केला. तर तब्बल 28 वर्षानंतर मिस वर्ल्ड या स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं. त्या अगोदर 1996 मध्ये 46व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात बंगळूर या ठिकाणी करण्यात आलं होतं. तर यावेळी ही स्पर्धा मुंबईमध्ये पार पडली.

Exit mobile version