Miss Universe 2023 : आयुष्य संपवायला निघालेली आज ठरली मिस युनिव्हर्स; कोण आहे जेन दीपिका गैरेट?
Miss Universe 2023 : सौंदर्याला जागतिक पातळीवर नेणारी स्पर्धा म्हणजे मिस युनिव्हर्स (Miss Universe 2023) ही स्पर्धा. ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. जगातील मानाची आणि सर्वांत लोकप्रिय अशी ही सौंदर्य स्पर्धा आहे. त्यात यावर्षी झालेली मिस युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा एका वेगळ्या कारणामुळे खास ठरली आहे. ते कारण नेमकं काय आहे? पाहूयात…
आयुष्य संपवायला निघालेली आज ठरली मिस युनिव्हर्स…
यावर्षी झालेल्या मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमध्ये तृतीय पंथीयांपासून प्लस साईजच्या मॉडेल्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे ही स्पर्धा यंदा खासच असणार होती. या सर्व स्पर्धकांनी इतिहास रचला आहे. मात्र यात आणखी भर म्हणजे नेपाळची प्लस साईज मॉडेल जेन दीपिका गैरेट ही या स्पर्धेची विजेती ठरली आहे.
कर्मचाऱ्यांच्या दबावापुढे कंपनी झुकली! CEO पद मिळवत Sam Altman यांची OpenAI मध्ये घरवापसी
जेन दीपिका गैरेट ही मिस युनिव्हर्स झाली ही गोष्ट अत्यंत खास आहे. कारण ती प्लस साईज मॉडेल आहे. त्याचबरोबर तिच्या वजन वाढण्याच्या समस्येमुळे एकेकेळी ती आपलं जीवन संपवायला निघाली होती. पण आज त्याच दीपिकाने जगाला तिची दखल घ्यायला लावली आहे. त्यामुळे यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा खास ठरली आहे.
Animal Movie: ‘अॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन
या स्पर्धेमध्ये विजयी होत दीपिकाने सौंदर्य म्हणजे झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन ही व्याख्या बदलली आहे. दीपिका 22 वर्षीय आहे. तर यावेळी तिने महिलांना आपल्या शरीराबद्दल आत्मविश्वास बाळगण्याचा संदेश दिला. तसेच तुमच्या शरीराच्या आकारापेक्षा सौंदर्य फॅशन आणि लूककडे लक्ष देण्याचं देखील तिने सांगितलं.
दीपिका एक नर्स आणि बिझिनेस डेव्हलपरही आहे. तिने नेपाळमधील काठमांडू परिसरात महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी काम केले आहे. तर तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे. गेल्या काही वर्षांत हार्मोनल बदलांमुळे तिच वजन वाढलं होतं. त्या न्यूनगंडामुळे ती आत्महत्या देखील करायाला निघाली होती. मात्र आज तिने तिच्या वजनासह सौंदर्य स्पर्धेत विजय मिळवला आहे.