Sienna Weir Passes Away : ‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचं 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झालेला अपघात

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T145516.606

Sienna Weir Death : ‘मिस युनिव्हर्स 2022’मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी मॉडेलने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करत असताना (Horse Riding) अभिनेत्रीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार २ एप्रिल दिवशी सिडनीच्या विंडसर पोलो ग्राऊंडमध्ये घोडेस्वारी करत होती. त्यावेळी ती घोड्यावरून पडून सिएनाचा अपघात झाला आहे. त्यानंतर तिला लगेच वेस्टमीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे तिला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं होतं. गेल्या काही आठवड्यांपासून ती लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होती. आज तिची प्राणज्योत मालवली.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

सिएनाला घोडेस्वारी करणं हे खूप आवडत असायचं. घोडेस्वारी करणं हे तिचं पॅशन असलयाचे तिने अनेकवेळा सांगितले आहे. मिस युनिव्हर्स २०२२ या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली होती. सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचे शिक्षण घेतले आहे. आता पुढीत शिक्षणासाठी युकेला जाणार असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते .

Tags

follow us