चेन्नईतील मिचॉन्ग वादळात 24 तास अडकला आमिर खान, असे झाले रेस्क्यू

Michhuang Cyclone : मिचुआंग चक्रीवादळामुळे (Michhuang Cyclone) चेन्नईमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले आहे. दरम्यान, चेन्नईतून (Chennai) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही (Aamir Khan) गेल्या 24 तासांपासून या वादळात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) त्याच्यासोबत आहे. आमिर खानची 24 तासांनंतर सुटका दरम्यान, नुकतेच […]

Aamir Khan

Aamir Khan

Michhuang Cyclone : मिचुआंग चक्रीवादळामुळे (Michhuang Cyclone) चेन्नईमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले आहे. दरम्यान, चेन्नईतून (Chennai) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही (Aamir Khan) गेल्या 24 तासांपासून या वादळात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) त्याच्यासोबत आहे.

आमिर खानची 24 तासांनंतर सुटका
दरम्यान, नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये अग्निशमन आणि बचाव विभाग आमिर खानला वाचवताना दिसत आहेत. आमिरसोबतच अभिनेता विष्णू विशालही या वादळात अडकला होता. या दोघांनाही आता 24 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

विष्णू विशालने फोटो शेअर केले
खुद्द विष्णू विशालने आपल्या X अकाउंटवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. आमिर खान आणि बचाव विभागासोबतची काही छायाचित्रे शेअर करत विष्णू विशालने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमच्यासारख्या अडकलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल अग्निशमन आणि बचाव विभागाचे आभार… आणि सातत्याने काम करणाऱ्या सर्व प्रशासकीय लोकांचेही आभार. …’ छायाचित्रांमध्ये आमिर आणि विष्णू बोटीत बसलेले दिसत आहेत.

‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी

साऊथ स्टार्सनी 10 लाख रुपये दान केले
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेतील कलाकार सूर्या आणि कार्ती यांनी चेन्नईतील लोकांच्या मदतीसाठी 10 लाख रुपयांची मदत केली आहे. हे सर्व अभिनेत्यांच्या फॅन क्लबच्या माध्यमातून वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात आमिर खान दिसला होता
आमिर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर दिसली होती. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची फारच वाईट अवस्था झाली होती. त्यानंतर आमिरने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता.

Exit mobile version