Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’(Aatmapamphlet) चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात या चित्रपटाच्या नावापासूनच लोकांची उत्सुकता वाढली आहे. त्यानंतर त्यांच्या ट्रेलरने देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा
त्यात अनेकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. त्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनीही सोशल मीडियावरून आपला लहानपणीचा फोटो शेअर करत ‘आत्मपॅम्फ्लेट’ला शुभेच्छा दिल्या आहेत. सनी देओल यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये त्यांनी त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, ‘बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं ! और ऐसी ही यादों से जुडा ‘आत्मपॅम्फ्लेट’ लेकर आ रहा है आशिष, असे म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावरूनच बॅालिवूडलाही ‘आत्मपॅम्फ्लेट’ची भुरळ पडल्याचे कळतेय.
“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार
हा चित्रपट आत्मपॅम्फ्लेट येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ मध्येही प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की.
BMC Covid Scam मध्ये लाच म्हणून वाटली सोन्याची बिस्कटं; ईडीच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती
अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला.