Abhijeet Sawant : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला गाण्याचा अग्रगण्य शो आय पॉपस्टार. राधिका भिडे, रोहित राऊत यांच्यासारख्या मराठमोळ्या गायका सोबतीने अनेक दर्जेदार गायकांची जुगलबंदी या कार्यक्रमात अनुभवयाला मिळते आणि अश्यातच या शोच्या प्री फिनालेसाठी गायक अभिजीत सावंत देखील या कार्यक्रमाचा भाग होताना दिसला आहे.
एव्हरग्रीन ट्रेंडसेटर गायक म्हणून ज्याने संपूर्ण जगाला त्याचा आवाजाने वेड लावलं आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता ठरलेल्या अभिजीतने (Abhijeet Sawant) आय पॉपस्टारमध्ये त्याचा ” मोहब्बत लुटाऊंगा ” सारख्या सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एका मोहित केलं. सोशल मीडियावर अभिजीतच मोहब्बत लुटाऊंगा गाणं पुन्हा एकदा ट्रेंड करताना दिसतय.
आय पॉपस्टार मधला अभिजीतचा या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या कॉमेंट्स ने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आय पॉपस्टारच्या (I popstar) प्री फिनाले बद्दल बोलताना अभिजीत सांगतो ” आय पॉपस्टार सारख्या शोवर पाहुणा गायक म्हणून जाण्याची संधी मला मिळाली आणि हा एक संपूर्ण अनुभव सुंदर सोहळा होता एक कमाल अनुभूती देऊन जाणारा हा शाळा अनुभव होता. आय पॉपस्टार सारखा शो अताच्या काळात मूळ संगीताला प्रोत्साहन देणारा एक म्युज़िकल कॉम्पिटिशन शो असून अनेक प्रतिभावान तरुण म्युझिशन्स (फक्त सिंगर्स नाही) पाहून मला खूप आनंद झाला. त्यांचं गीतलेखन, गाण्यांची प्रेझेंटेशन, म्युझिक सगळंच खूप अप्रतिम होत. इंडी म्युझिकचे मोठे स्टार्स असलेले माझे कलाकार गायक मित्र पर्मिश, आदित्य, किंग आणि आस्था त्यांना मेंटर म्हणून साथ देत आहेत हीही मोठी गोष्ट आहे.
इंडियन आयडॉल नंतर मला कायम अशा स्टेजवर उभं रहायचं होतं जे आजच्या ओरिजिनल म्युझिकला प्रेक्षकांसमोर घेऊन येतं राहतील आणि आय पॉपस्टार हे काम उत्तमरीत्या करत आहे. या निमित्तानं मला ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ पुन्हा एकदा परफॉर्म करण्याची संधीही मिळाली पण यावेळी एक ट्विस्ट होता कारण हा GenZ शो असल्यामुळे मी ‘मोहब्बतें’चा एक नवीन, वेगळा व्हर्जन तयार करून सदर केलं आणि ते व्हायरलही झालं”
मनसेची मान्यता रद्द करा अन् राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल
2025 हे वर्षात अभिजीत सावंत गायन इंडस्ट्रीत 20 वर्ष पूर्ण करत असताना त्याचा क्लासिक ओल्ड गाण्याचं हे ट्विस्ट असलेलं मोहब्बतें प्रेक्षकांना अनुभवता आलं याहून मोठी गोष्ट काय असणार. येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार असून लवकरच तो एका नव्या कोऱ्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे.
