Download App

Ghumar Trailer Out : ‘ये लाईफ मॅजिक का खेल है…’ अभिषेक बच्चनच्या ‘घुमर’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज

Ghumar Trailer Out : बिग बी यांच्या चिरंजीवाचे म्हणजेच अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी ‘घुमर’ (Ghumar) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या सिनेमाचे नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Abhishek Bachchn Upcoming Movie Ghumar Trailer Out)

राहुल गांधींना दिलासा! खासदारकी बहाल; सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social media) हॅंडलवर या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. सिनेमा एका विकलांग खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेर ही निभावणार असल्याचे पाहायला मिळाले आहे. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

…तर सीमाला पाकिस्तानातून तिकीट देऊ, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिलं स्पष्टीकरण

काय आहे या ट्रेलरमध्ये ?
या ट्रेलरवरून या चित्रपटाचा अंदाज येत आहे. यामध्ये सैयामी खेर ही एका खेळाडूच्या भूमिकेत आहे. मात्र एका अपघातानंतर तिचं आयुष्य बदलत. त्यात अभिषेक तिच्या मदतीला येतो. त्यात तो एका ट्रेनर आणि गाईडच्या भूमिकेत आहे. तो तिला तिच्या विगलांगतेवर मात करून पुन्हा खेळण्याची उमेद देतो. या ट्रेलरमध्ये अभिषेक आणि सैयामीचे जबरदस्त संवाद दाखवण्यात आले आहेत. त्यावरून हा चित्रपटा चाहत्यांच्या नक्की पसंतीस उतरेल असा अंदाज येत आहे. हा सिनेमा वास्तववादी परिस्थितीचं चित्रण करणार अशी अपेक्षा चाहत्यांना वाटत आहे.

तसेच लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अभिषेकने याअगोदर आर. बल्की यांच्यासह ‘पा’ या सिनेमात काम केलं आहे. ‘घुमर’ हा सिनेमा १८ ऑगस्ट दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे काही हटके कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Tags

follow us