मुंबई मनपाची निवडणूक लढणाऱ्या डॅडींच्या मुलीशी अभिनेत्याचं सूत कसं जुळलं?

Arun Gawali यांची मुलगी योगिता हिचा पती मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितले.

Arun Gawali

Arun Gawali

Actor Akshay Waghamare how tie knot with Arun Gawalis Daughter Yogita who fighting BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या ठिकाणी एकीकडे विविद राजकीय पक्षांची त्यांच्या युत्या आणि आघाड्यांची चर्चा असताना अपक्ष उमेदवारांची देखील तेवढीच चर्चा आहे. त्यामध्ये डॉन अरूण गवळी यांच्या मुली देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यातील योगिता यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांचे पती देखील होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना त्यांचे एका अभिनेत्यासोबत कसे सूत जुळले त्याचा खास किस्सा सांगितला.

डॅडींच्या मुलीशी अभिनेत्याचं सूत कसं जुळलं?

मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा डॉन अरूण गवळी यांच्या मुलगी योगिता हिचा पती आहे. त्यांचा हा प्रेमविवाह आहे. त्यांनी ही हिंमतीची गोष्ट कशी यशस्वी केली याबबात त्यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते. कारण डॅडी म्हणजे अरूण गवळींचा मुंबईतील दगडी चाळीमध्ये दरारा आहे. त्यांना माननारा आणि तेव्हढाच घाबरणारा देखील वर्ग आहे. त्यात त्यांच्या मुलीशी लग्न करणे म्हणजे हिंमतच म्हणावी लागेल.

नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी WhatsApp कडून खास फीचर्सची भेट; नवीन स्टिकर्ससह स्टेटसमध्ये बदल

दरम्यान आपल्या या नात्याबद्दल सांगताना अक्षय म्हणाला की, योगिताचे कझिन्स माझे मित्र होते. त्यांच्यामुळे आमची भेट झाली. त्यानंतर 20218 ला मी फुलराणी ही मालिका करत असताना आमची ओळख आणि बाँडिंग वाढलं. मग आम्ही घरच्यांच्या कानावर घालणं आणि लग्न करणं या स्टेप्स पार केल्या. माझ्या घरच्यांचा अगोदर थोडा विरोध होता. मात्र ते डॅडी आणि मम्मीला भेटले त्यांचा स्वभाव बघितला मग त्यांचा विरोध कमी झाला.

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानसाठी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन मिळणार

तर यावर बोलताना योगिता म्हणाल्या की, आमचं हे नात मैत्रीच्या नात्यामध्ये घडलं. एक काही तरी क्लिक व्हावं लागतं ते झालं आणि एकमेकांसोबत कम्फर्ट पण होतो. त्यामुळे आम्ही जास्त जवळ आलो आणि लग्न बंधनात अडकलो.

Exit mobile version