Al Pacino: 83 वर्षीय हॉलिवूड अभिनेता अल पचीनो चौथ्यांदा होणार बाबा, 29 वर्षाची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट

Al Pacino Fourth Time Father: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो (Al Pacino) हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार असल्याची माहिती अभिनेत्याच्या प्रतिनिधीने दिली आहे. अल पचीनो आणि त्याची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह (Noor Alfallah) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नूर ही ८ महिन्यांची गरोदर आहे.   View this post on […]

Letsupp Image

Al Pacino

Al Pacino Fourth Time Father: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो (Al Pacino) हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार असल्याची माहिती अभिनेत्याच्या प्रतिनिधीने दिली आहे. अल पचीनो आणि त्याची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह (Noor Alfallah) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नूर ही ८ महिन्यांची गरोदर आहे.


अल पचीनो (Al Pacino) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह ही 29 वर्षाची आहे. ती एप्रिल 2022 पासून अल पचीनोला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. एकदा दोघांना डिनर डेटला जात असताना स्पॉट करण्यात आले होते. नूर अलफल्लाहने या अगोदर ज्येष्ठ गायक मिक जेगर आणि मिलेनियर निकोलस बर्गरेन यांना डेट केले होते.


अल पचीनो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना ज्युली नावाची मुलगी आहे. ज्युली ही 33 वर्षाची आहे. 1997 ते 2003 या वर्षात अल पचीनोनं बेव्हरली डी’एंजेलोला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुले आहेत. या मुलांचे वय सध्या 22 वर्ष आहे. आता अल पचीनो हा चौथ्यांदा बाप होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

क्लासिक द गॉडफादर (The Godfather) सीरिजचा स्टार असणाऱ्या अल पचीनोने ‘स्कारफेस’, ‘सेंट ऑफ अ वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ लव्ह’, ‘द डेव्हिल्स अॅडव्होकेट’, ‘द इनसाइडर’ या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. जस्टिस फॉर ऑल , कार्लिटोज वे, डॉनी ब्रास्को, ओशनज थर्टीन अशा बऱ्याच आयकॉनिक सिनेमामध्ये देखील त्याने काम केले आहे.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

तसेच त्याच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’, ‘द आयरिशमन’, ‘हाऊस ऑफ गुच्ची’, ‘द पायरेट्स ऑफ सोमालिया’, ‘डॅनी कॉलिन्स’ या सिनेमानं देखील चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. गेल्या काही दिवसापासून 79 वर्षीय अभिनेता रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा सातव्यांदा बाप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘द आयरिशमॅन’, ‘द गॉडफादर: पार्ट 2’, ‘रेजिंग बुल’ आणि ‘टॅक्सी ड्राइव्हर’ या सिनेमामध्ये रॉबर्ट डी नीरोनं काम केलं आहे. एका मुलाखतीमध्ये रॉबर्ट डी नीरोनं सांगितले होते की, ‘माझ्या आयुष्यात सातव्या मुलाचे आगमन होणार आहे. तसेच तो १९९७ ते २००३ पर्यंत बेवर्ली व पचीनो रिलेशनशिपमध्ये होता.

Exit mobile version