Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर?

Shraddha Kapoor Post: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) ही बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी कायम ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत असते. अनेकदा ती आपल्याला स्पष्ट मराठीत बोलताना दिसते. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या श्रद्धा […]

Shraddha Kapoor Post

Shraddha Kapoor Post

Shraddha Kapoor Post: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) ही बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी कायम ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत असते. अनेकदा ती आपल्याला स्पष्ट मराठीत बोलताना दिसते. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या श्रद्धा ह्रतिकसोबत ‘क्रिश 4 ‘मध्ये (Krrish 4 Movie ) झळकणार अशी जोरदार चर्चा रंगत आहे.


अलिकेडच श्रद्धाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर होते. एका फोटोंमध्ये ती उन्हात बसली असल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्याची किरणात तिचं सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे. हे फोटो शेअर करत असताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘जादूप्रमाणे मलाही सूर्यप्रकाशाची गरज आहे’. श्रद्धाच्या या फोटोंवर हृतिक रोशनने देखील कमेंट केल्याचे बघायला मिळत आहे. हृतिकने लिहिलं, ‘तो येत आहे. त्याला सांगेन’. याला उत्तर देत असताना श्रद्धाने लिहिले की, ‘खरंच..?…तो कधी आणि कुठे येतोय’. श्रद्धा कपूरच्या या फोटोंवर हृतिक रोशनच्या कमेंटनंतर, चाहते सध्या अंदाज लावत आहेत की दोघेही ‘क्रिश 4’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

श्रद्धाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाले तर, श्रद्धा कपूर शेवटची ‘तू झुठी मैं मक्कर’ मध्ये दिसली होती. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर दिसला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता श्रद्धा कपूर ‘स्त्री 2’, ‘नागिन’ सारख्या अनेक सिनेमात दिसणार आहे. श्रद्धा कपूरच्या या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तसेच अभिनेता हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘फायटर’ हा सिनेमा 25 जानेवारी 2024 दिवशी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हृतिकच्या चाहत्यांना सिनेमासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘फायटर’ देशभक्तीपर सिनेमा असणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यापूर्वी त्यांनी हृतिकच्या ‘वॉर’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

Exit mobile version