Actor Kshitish Date Receives Filmfare Award : आजवर वैविध्यपूर्ण कलाकृती (Filmfare) मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता क्षितीश दाते हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धर्मवीर 2 साठी फिल्मफेअर 2025 बेस्ट सपोर्टींग अभिनेता हा खास पुरस्कार क्षितीशला मिळाला असून, हा त्यांचा पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे.
मोठी बातमी, बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक
धर्मवीर 2 मधल्या त्यांचा कामासाठी हा खास पुरस्कार त्याला मिळाला असून त्याने पुन्हा एकदा या भूमिकेची ताकद दाखवून दिली आहे. धर्मवीर 2 मध्ये त्याने माननीय एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेला हा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाला आहे.
सध्या क्षितीश दाते हॉटस्टारच्या मिस्त्री वेब शोमध्ये काम करताना दिसला आहे. सोबतीने मी vs मी हे नाटक देखील सुरू आहे. येणाऱ्या काळात देखील तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फिल्मफेअर मराठी २०२५’ – पुरस्कार सोहळ्यातील संपूर्ण विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट – पाणी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
सर्वोत्कृष्ट चित्रपट ( परीक्षक पसंती ) – गाठ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्राजक्ता माळी – फुलवंती आणि वैदेही परशुरामी ( एक दोन तीन चार )
सर्वोत्कृष्ट अभिनेता ( परीक्षक पसंती ) – जितेंद्र जोशी – गाठ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( परीक्षक पसंती ) – राजश्री देशपांडे – सत्यशोधक
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री – जुई भागवत – लाइक अँड सबस्क्राइब
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता – धैर्य घोलप – येक नंबर
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – क्षितीश दाते – धर्मवीर २
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – नम्रता संभेराव – नाच गं घुमा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे – पाणी
सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माडे – फुलवंती ( मंदनमंजिरी )
सर्वोत्कृष्ट गायक – राहुल देशपांडे – अमलताश
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम २०२५ – फुलवंती
सर्वोत्कृष्ट संवाद – महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार – उषा मंगेशकर
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले – नितीन दीक्षित – पाणी
सर्वोत्कृष्ट कथा – गाठ चित्रपट
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक – नवज्योत बांदिवडेकर – ‘घरत गणपती’ आणि राहुल पवार
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – एकनाथ कदम – फुलवंती
सर्वोत्कृष्ट संगीत – अनमोल भावे – पाणी
सर्वोत्कृष्ट Costume डिझाइन – फुलवंती
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर – उमेश जाधव – फुलवंती
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – गुलराज सिंग – पाणी
सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गाठ चित्रपट
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – महेश लिमये – फुलवंती