Download App

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ

Malaika Arora Father : बॉलिवूडमधील नृत्यांगणा मलायका अरोरावर (Malaika Arora Father) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Malaika Arora Father Death: अभिनेत्री  मलायका अरोराशी (Malaika Arora ) संबंधित दु:खद बातमी येत आहे. खरंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मलायका अरोराच्या (Malaika Arora Father Death) वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 9  वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर मलायका अरोरा पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे. सध्या अभिनेत्रींच्या वडिलांचे पार्थिव बाबा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

 

अरबाज खान मलायकाच्या घरी पोहोचला

ही बातमी कळताच मलायका अरोराचा माजी पती अरबाज खान अभिनेत्रीच्या घरी पोहोचला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली आहे. वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, सध्या पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मलायकाचे वडील काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मलायका अरोरा पुण्याहून मुंबईसाठी रवाना…

अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका अरोरा घरी नव्हती. आज सकाळी ती पुण्यात होती. घटनेची माहिती मिळताच ती मुंबईहून पुण्याकडे रवाना झाली. या बातमीनंतर अनेक सेलेब्स देखील अभिनेत्रीच्या घरी पोहोचत आहेत.

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील मूळ रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. त्यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाल्याचे अभिनेत्रीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

follow us