Download App

Shah Rukh Khan: किंग खानचं ‘जवान’ सिनेमाबद्दल मोठं गौप्यस्फोट; म्हणाला, ‘यापुढे कधीच करणार…’

Shah Rukh Khan Statement: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किंग खानचे चाहते खूप आतुरतेने या सिनेमाची वाट बघत आहेत. तर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला (Jawan trailer) सध्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. (Social media look) या सिनेमामध्ये पहिल्यांदा किंग खानने टक्कल असलेल्या लूकमध्ये बघायला मिळाला होता. आता त्याबद्दल त्याने एक मोठं गौप्यस्फोट केलं आहे.


गेल्या काही काही दिवसांपासून ‘जवान’ सिनेमाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये पहिल्यांदाच किंग खान टक्कल असलेला बघायला मिळाला होता. त्याचा हा लूक बघून सर्वांच्याच भुवया उंचावले आहेत. मग त्याचा हा लूक गेल्या काही दिवस जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. तर आता किंग खाननेच यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच बुर्ज खलिफा येथे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न पडला. यावेळी किंग खानने या सिनेमातील त्याच्या लूक्सबद्दल सर्वांना सांगितलं. तो म्हणाला आहे की, “या सिनेमात प्रत्येकाला खूप आवडेल अशी एक तरी गोष्ट आहेच. ॲक्शन, ड्रामा, इमोशन, गाणी, डान्स… या सिनेमात प्रत्येकासाठी काही ना काही आहे. म्हणूनच मी या सिनेमामध्ये अनेक हटक्या लूक्समध्ये बघायला मिळणार आहे. या सिनेमात मी टक्कल असलेल्या लूकमध्येही दिसत आहे. जो लूक मी यापुढे कधीही करणार नाही, असा गौप्यस्फोट त्याने यावेळी केला आहे.

Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाला…

अॅक्शन आणि मनोरंजनाने भरलेल्या किंग खानच्या ‘जवान’बद्दल आता चाहत्यांची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘जवान’च्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र जोरदार खळबळ उडवून दिला आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रदर्शितची म्हणजेच ७ सप्टेंबरची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. किंग खानच्या ‘जवान’चे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तर, तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर आणि निर्माता भूषण कुमार आहेत. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात किंग खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या सिनेमातून पदार्पण केले आहे. ‘जवान’ हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us