Download App

Shah Rukh Khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुखने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला…

Shah Rukh Khan on Aryan Khan Drug Case : बॉलीवूडचा (Bollywood) सुपस्टार म्हणून किंग खानला (Shah Rukh Khan) ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने चाहत्यांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केले आहे. जगभरात किंग खानचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबत शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा जोरदार चर्चेत असतो. 2021मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केसप्रकरणी अटक (Aryan Khan Drug Case) करण्यात आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने पहिल्यांदा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणी मौन सोडले आहे.


सुपरस्टार शाहरुख खानला इंडियन ऑफ द इयर 2023 चा किताब देण्यात आला. यादरम्यान, अभिनेत्याने मंचावर खूप वेळ भाषण केले आहे. त्याने सांगितले की, गेल्या चार ते पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप वाईट होती. त्यांचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. आणि कुटुंबाला एकामागून एक अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अभिनेत्याने हे सर्व कसे हाताळले आणि कठीण काळात काय शिकलो अशा अनेक प्रश्नावर किंग खानने मौन सोडले आहे.

माझे चित्रपट फ्लॉप होत होते: शाहरुख खानने एका पुरस्कार सोहळ्यात सांगितले आहे की, “गेल्या 4-5 वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी थोडी कठीण गेली आहेत. मला खात्री आहे की तुमच्यापैकी काहींसाठी ते कोविडमुळे देखील असेल. माझे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले आणि अनेकांनी माझ्या करिअरच्या शेवटची कथा लिहायला सुरुवात केली. आणि मग वैयक्तिक पातळीवर काही समस्या निर्माण होऊ लागल्या. या सर्व समस्यांमधून मला मिळालेला धडा म्हणजे शांत राहणे आणि सन्मानाने कठोर परिश्रम करणे.

अभिनेता पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, तेव्हा आयुष्य तुम्हाला कुठूनतरी धक्का देत असते. पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही नवीन आशा आणि सत्य घेऊन पुढे बिघत. पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला आशा आहे की गोष्टी पूर्ण होतील. तुम्हाला आनंदी राहावे लागेल आणि तुम्ही करत असलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे कराव्या लागतील. मला कोणीतरी सांगितले की आयुष्य हे चित्रपटांसारखे असते.

ना शाहरुख…ना रजनीकांत…ना प्रभास, ‘या’ अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला!

आर्यन खानला तुरुंगात जावे लागले: 2021 मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण सतत चर्चेत होते. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगातही जावे लागले होते. त्यानंतर शाहरुख खान पूर्णपणे शांत झाला होता आणि आपल्या मुलाला या प्रकरणातून शांततेने बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. यादरम्यान अनेकांनी शाहरुखला लक्ष्य केले होते आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले होते. मे 2022 मध्ये आर्यनची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि शाहरुखच्या चाहत्यांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

follow us