Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव आहे. सध्या ते पुरुष (Purush) या नाटकाच्या निमित्ताने चर्चेत आहेत. त्यांच्या पुरूष या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र, आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theatre) ‘पुरुष’च्या प्रयोगावेळी शरद पोक्षेंना (Sharad Ponkshe) काहीच आठवेना आणि त्यांना प्रयोग रद्द करावा लागला. खुद्द पोक्षेंनीच मी पूर्ण ब्लॅंक झालोय, मला काहीही आठवत नाहीये असं म्हणत प्रेक्षकांची माफी मागितली.
वाल्मिक कराडला का अटक होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?, वडेट्टीवार संतापले…
40 वर्षापूर्वीचं जयवंत दळवींचं नाटक शरद पोक्षे आणि दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे. सध्या या नाटकाचं सर्वत्र कौतूक होतंय. आज या नाटकाचा बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग होता. नाटकचा पहिला अंक उत्तम झाला, पण दुसऱ्या महत्वाच्या सीनची सुरवात झाली तेव्हा शरद पोंक्षे नुसते प्रेक्षकांकडे बघत होते. नंतर त्यांनी रसिक प्रेक्षकहो, मी पूर्ण ब्लॅंक झालोय, मला काहीही आठवत नाहीये, 2 मिनिटं थांबू का?, अशी विचारणा केली आणि प्रेक्षकांनीही आम्ही तुमचे फॅन आहोत, तुम्ही वेळ घ्या, असं म्हटलं.
Dileep Sankar : हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिध्द अभिनेत्याचा मृतदेह, मनोरंजन क्षेत्रात शोककळा…
दरम्यान, सगळे लाईट्स बंद केले गेले, पोंक्षे आत विंगेत गेले, 2 मिनिटांऐवजी 5 मिनिटं झाली, 10-15 मिनिटं झाली. मग दिग्दर्शकांनी स्टेजवर येऊन सांगितलं की, आम्ही प्रयत्न करतोय, हळूहळू थोडं-थोडं आठवतंय पण अजून थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल तेव्हा इटरवल आताच डिक्लेअर करतो… इंटरवल नंतर अर्धा तास पाऊण तास झाला, स्टेजवरचे लाईट्स लागले म्हणून सगळे प्रेक्षक खुर्चीवर जाऊन बसले, नंतर 2 मिनिटांनी शरद पोंक्षेना धरून स्टेजवर आणलं. पोंक्षे म्हणाले गेल्या 40 वर्षात असं पहिल्यांदा होतंय, मी तुमची माफी मागतो आणि तुमचे पैसे परत मिळतील आणि आजचा प्रयोग रद्द करण्यात आलाय.
पुरुष या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे यांच्याही नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.