‘बंजारा’च्या 20 फुटी भव्य पोस्टरचं अनावरण; भरत जाधव अन् सुनील बर्वे पहिल्यांदाच एकत्र

‘बंजारा’च्या 20 फुटी भव्य पोस्टरचं अनावरण; भरत जाधव अन् सुनील बर्वे पहिल्यांदाच एकत्र

Banjara Movie : बंजारा चित्रपटाच्या (Banjara Movie) 20 फुटी भव्य पोस्टरचे अनावरण महेश मांजरेकर यांच्या हस्ते पार पडलंय. या शानदार सोहळ्यात अभिनेते शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची धमाकेदार एन्ट्री झालीयं. बुलेट गाडीवर स्वार होत या अभिनेत्यांनी एन्ट्री मारलीयं. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवता येणार असून नाताळमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टोल माफी ते कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचे नाव; शेवटच्या बैठकीत शिंदेंचे धडाकेबाज 19 निर्णय

नूकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्कर मित्र सिक्किमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ चित्रपट असल्याचं चित्रपटाचे निर्माते शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केलंय.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन, उज्जैन आणि ओंकारेश्वरमध्ये मुंबई पोलिसांचे छापे

निर्माते शरद पोंक्षे बोलताना म्हणाले, हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनाची कथा सांगणारा आहे. स्नेहने हा विषय खूपच सुंदर हाताळला आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची ही कथा प्रेक्षकांचे मतपरिवर्तन करणारी आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना साधारण कथेचा अंदाज आला असेलच. मला खात्री आहे, चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलंय.

जावई समीर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; ‘त्या’ बातम्या साफ खोट्या, नवाब मलिकांचा खुलासा

तर दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणाले, माझ्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत, भरत जाधव, सुनिल बर्वे अश्या दिग्गच कलाकारनसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा मला या चित्रपटासाठी निश्चितच फायदा झाला आहे. ‘बंजारा’ चित्रपटाच्या संकल्पनेतून मला एक गोष्ट सांगायची होती, असं म्हणतात की कुठे जायचंय त्यापेक्षा तिथे जाण्याचा प्रवास आनंददाई असायला हवा पण आपण तो आनंद कधी लुटतच नाही. बंजाऱ्यासारखं जमलं पाहिजे आनंदाने प्रवास करता आला पाहिजे, फिल्ममधला प्रवास ही प्रेक्षकांना नक्की अवडेल याची खात्री असल्याचं पोंक्षे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube