‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच बुकींगचा धमाका; पहिल्याच दिवशी होणार छप्परफाड कमाई

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 15T211754.653

Adipurush Box Office Collection :  ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट उद्या म्हणजेच 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. पण चाहत्यांमध्ये या चित्रपटाची एवढी क्रेझ होती की, रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी त्याची आगाऊ बुकिंग करून घेतली. आता आगाऊ बुकिंगचे आकडेही बाहेर येऊ लागले आहेत. जे पाहून पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या चित्रपटात प्रभास ‘भगवान राम’च्या भूमिकेत असून अभिनेत्री क्रिती सेनन ‘सीता’ची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा चित्रपट जवळपास 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. त्यामुळेच हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, प्रभास आणि क्रितीचा हा चित्रपट देशभरात एकूण 6200 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. ज्यामध्ये 4000 स्क्रीन फक्त हिंदी आहेत. मात्र, ही सर्व आकडेवारी अंदाजानुसार सांगण्यात आली आहे. प्रेक्षक 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारे चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाची आतापर्यंत सुमारे 3.50 लाख तिकिटे विकली गेली आहेत. सर्व भाषा एकत्र करून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार प्रभासचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी केवळ हिंदी आवृत्तीत 25-30 कोटींची कमाई करू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तेलुगु व्हर्जनचा ‘आदिपुरुष’ पहिल्या दिवशी 60 कोटींची बंपर कमाई करू शकतो.

Tags

follow us