Taapsee Pannu Wedding: सध्या चित्रपटसृष्टीत लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. आता अभिनेत्री तापसी (Taapsee Pannu) पन्नू प्रदीर्घ काळानंतर प्रियकर मथियास बो (Mathias Boe) याच्यासोबत गुपचूप लग्न केले आहे. (Taapsee Pannu Wedding) मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोसोबत लग्न सोहळा पार पडला आहे. तापसी आणि मथियास खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा येत होत्या, मात्र तापसीने याला दुजोरा दिला नाही.
रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, त्यांच्या लग्नात फार कमी आणि अगदी जवळचे पाहुणे उपस्थित होते. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये पावेल गुलाटी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचाही समावेश होता.
काही काळापूर्वी दोघांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. दोघांच्या लग्नाचे विधी 20 मार्चला सुरू झाले आणि 23 मार्चला लग्नासोबतच संपले. या सोहळ्याला तिचे जवळचा मित्र पावेल गुलाटीने दोन दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा फोटो शेअर केला होता. फोटोत सर्व मित्र लग्नाच्या रंगात परिधान केलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “आम्ही कुठे आहोत याची कोणालाच कल्पना नाही.
OTT Platform: तेजा सज्जाचा ‘हनुमान’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?; वाचा सविस्तर…
तापसी पन्नूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या लेखिका कनिका ढिल्लनने काल काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. ही छायाचित्रेही तापसीच्या लग्नसोहळ्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. कनिका आणि तापसीने हसीन दिलरुबा, मनमर्जियां, डंकी आणि फिर आयी हसीन दिलरुबा यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, या मित्रांनीही लग्नाबद्दल एक शब्दही लिहिला नाही.
तापसी पन्नू आणि मथियास बर्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही रिलेशनशिपवर काहीही सांगितले नसले तरी. दोघांची पहिली भेट 2013 मध्ये झाली होती. मॅथियास हा डॅनिश बॅडमिंटनपटू असून त्याने 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे.