Download App

उत्तम काम.. सोबतीला आव्हान; 2024 मध्ये अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

  • Written By: Last Updated:

Actress Amruta Khanvilkar Special Projects In 2024 : अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी (Amruta Khanvilkar) 2024 हे वर्ष अतिशय खास ठरलंय. तिने अनेक आव्हानात्मक कामं या वर्षात केले आहेत. डिसेंबर महिना सुरू असून 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्यासाठी कसं होत, हे शेयर केलंय. अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड (Entertainment News) प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली.

चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश

बॉलिवुडमध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं. त्या भूमिका खास (Marathi Movie) केल्या, आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या. 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवलं तसेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले.

मंत्रिमंडळात १६ जिल्ह्यांची पाटी कोरीच; पुणे-साताऱ्याचा राजकारणात दबदबा

अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे. तिने हे या वर्षात देखील सिद्ध केलं. “वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नातं हे अतूट आहे. म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या.

अमृताचं काम इथेच थांबत नाही, तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली. नेहमीपेक्षा वेगळं, पण तितकंच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जजच्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार? हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

follow us