Download App

हरलीन सेठीने हातावर बनवला टॅटू, म्हणाली माझ्या परंपरा शेवटपर्यंत…

Harleen Sethi : अभिनेत्री हरलीन सेठी हिने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच लोकांचं मन जिंकले आहेत. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या कोहरा या शोमध्ये निमरत ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या शोची कथा अत्यंत सुंदर आणि मनाला भावणारी आहे. असे हरलीन सांगते. तर याच शोमुळे प्रोत्साहित झाल्याने हरलीन आपल्या हातावर पंजाबी परंपरेतील गुरुमुखी या लिपीमध्ये एक टॅटू बनवला आहे. ( Actress Harleen Sethi make a tattoo on hand inspired by Kohara )

महाराष्ट्रात पॉवर गेम! राष्ट्रवादीवर टाकलेला डाव फडणवीसांवरच उलटणार

त्याचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना हरलीन म्हणाली, कोहरा या शोमध्ये मी साकारत असलेले निमरत ही भूमिका माझ्यासारखीच आहे. कारण मी देखील मुंबईत राहत असल्याने आपल्या पंजाबी परंपरेला तितकसं आपलंसं केलं नाही. मी त्यापासून नेहमीच दूर राहिले आहे. शहरात जन्मल्याने आणि मोठी झाल्याने माझा अॅटीट्यूड कॉस्मोपॉलिटीन होता.

मात्र कोहरा या शोमुळे मला आमच्या पंजाबी परंपरेप्रमाणे गुरुमुखी लिपीमध्ये ‘निर्भाऊ निरवैर’ हा टॅटू बनवण्याची इच्छा झाली. जो जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे. पुढे ती म्हणाली की, आज, मला याचा अभिमान आहे की, मी माझ्या मूळ संस्कारांपासून सुरूवात करत पुढे जाण्याची तयारी करत आहे.

Faf Du Plessis Birthday: क्रिकेट विश्वाचा ‘राजा’ ज्याला क्रिकेट बोर्ड सक्तीने निवृत्त करतंय

हरलीनसाठी कोहरा खरोखरच खास आहे. कारण या अगोदर तिने प्रेक्षकांना तिच्या गॉन गेम सीझन 2, ब्रोकन बट ब्यूटीफुल आणि काठमांडू कनेक्शनमधील या शोजमधील तिच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. तर आता ती पुन्हा एकदा कोहरा या शोमधून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tags

follow us