Download App

इस्रायलमध्ये अडकेलली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात कशी परतली ?

Nusrat Bharucha : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine War) शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती. ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले होते आणि तिने सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता नुसरतबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नुसरत भरुचा भारतात परतली
युद्धात इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत आता सुखरूप आपल्या देशात परतली आहे. मुंबई विमानतळावरून बाहेर पडलेल्या नुसरतची पहिली झलक समोर आली आहे. नुसरत पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, ती खूपच नर्व्हस दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.

नुसरतला इस्रायलमधून कसे बाहेर काढले गेले?
इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धात नुसरतशी संपर्क तुटला होता. सगळ्यांना तिची काळजी वाटत होती. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर त्यांच्या टीमला नुसरतशी संपर्क साधण्यात यश आले. नुसरत भरुचाच्या टीमने सांगितले होते की अखेर आम्ही नुसरत भरुचा यांच्याशी संपर्क साधला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला भारतात सुखरूप परत आणले जात आहे. ती सुरक्षित असून भारतात परतली आहे.

चेन्नईत भारतीय फिरकीपटूंचा जलवा, दीडशे धावांवर ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट

नुसरत इस्रायलमध्ये कशी अडकली?
नुसरत भरूचा हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग होण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण त्याच दरम्यान तिथे युद्ध झाले आणि नुसरत तिथेच अडकली. तिच्या टीमने याबाबत माहिती दिली होती.

माहिती देताना तिच्या टीमने नुसरत तळघरात असून सुरक्षित असल्याचे सांगितले होते. पण नुसरतसोबतच्या या संवादानंतर तिच्या टीमचा संपर्क तुटला तेव्हा चिंता वाढली होती. तिची टीम म्हणाली होती की आम्ही संपर्क करू शकत नाही. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती सुरक्षित परतेल अशी आशा आहे. आता ताज्या माहितीनुसार नुसरत सुखरूप विमानतळावर पोहोचली आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो

या चित्रपटांमध्ये नुसरतचा जलवा पाहायला मिळाला
नुसरत भरुचाबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. नुसरतने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा, ड्रीम गर्ल, जनहित में यारी, राम सेतू सारखे चित्रपट केले आहेत. नुसरत शेवटची अकेली चित्रपटात दिसली होती.

Tags

follow us