अभिनेत्री रकुल प्रीत-जॅकी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, पाहुण्यांसाठी ‘नो फोन पॉलिसी’

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet) आणि जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याची माहिती समोर आली आहे. 22 फेब्रुवारीला गोव्यातील झिरोडमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम दोन दिवसांचा असणार आहे. लग्नासाठी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना निमंत्रित […]

Rakul Preet Jackie Bhagnani Wedding

Rakul Preet Jackie Bhagnani Wedding

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet) आणि जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याची माहिती समोर आली आहे. 22 फेब्रुवारीला गोव्यातील झिरोडमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम दोन दिवसांचा असणार आहे. लग्नासाठी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले आहे. लग्नात गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या कपलच्या जवळच्या मित्राने लग्नाशी संबंधित माहिती दिली आहे. लग्नाचे कार्यक्रम गोव्यात दोन दिवस चालणार आहेत. या कपलला त्यांच्या लग्नाची गोपनीयता ठेवायची आहे. यासाठी त्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना निमंत्रित केले आहे. कुटुंबासोबतच बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील लोकही लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

गॅब्रिएल अटल ठरले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाची गोपनीयता लक्षात घेऊन कोणालाही फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. अतिथींनी फोन नो पॉलिसीचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांच्या लग्नासाठी एक खास थीम असल्याची माहिती आहे.

Kangana Ranaut : बिल्किस बानोवर कंगना घेऊन येतीय चित्रपट, स्क्रिप्ट देखील तयार

दोघांनी लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला या कपलच्या लग्नाची बातमी आली होती आणि तीही त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली होती. सूत्राने सांगितले की, रकुल आणि जॅकी 22 फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार आहेत. त्यांना लग्नाची घाई आहे पण लग्नाची गोपनीयता असावी अशी त्याची इच्छा आहे.

Exit mobile version