Download App

राणी मुखर्जीने पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ वडिलांना केला अर्पण, म्हणाली हा सन्मान..,

अभिनेत्री राणी मुखर्जीने मिळालेला पहिला राष्ट्रीय पुरस्कार आपल्या स्वर्गीय वडिलांना अर्पण केला असल्याचं भावूक तिने सांगितलंय.

Rani Mukharji : राष्ट्रीय पुरस्कार माझ्यासाठी मोठा असून मी खरंच भारावून गेले आहे, हा पुरस्कार मी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करीत असल्याचं म्हणत अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukharji ) पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक झालीयं. 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण काल राष्ट्रपती भवनात पार पडलं. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते काल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जीला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

Solapur Flood : ‘अहो, दादा आमच्या बांधावर या’; अजितदादा पूरग्रस्तांना काय म्हणाले?

आपल्या 30 वर्षांच्या अभिनय प्रवासात पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकून राणी मुखर्जी भावूक झाली. पुढे बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, मी खरंच भारावून गेले आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी तो माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करते, ज्यांनी नेहमी या क्षणाचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांची खूप आठवण येते. मला ठाऊक आहे की, त्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईची प्रेरणा व ताकदच मला मिसेज चटर्जीचा रोल करताना साथ देत होती असं मुखर्जींने स्पष्ट केलंय.

10 किलो गहू – तांदूळ अन् 5 हजारांची मदत; पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषण

राणीने आपल्या चाहत्यांचे आभार मानताना म्हणाली, माझे अद्भुत फॅन्स, सुख-दुःखात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं न थांबणारं प्रेम आणि साथ हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मला ठाऊक आहे की, हा पुरस्कार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला आनंद होताना पाहून माझ्या मनालाही अपार आनंद मिळत आहे.

पवारांना धक्का; दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पठारेंचा मुलगा, भाचा अन् पुतण्या करणार भाजपात जाणार?

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जीने दिग्दर्शिका असीमा, निर्माते निखिल, मोनिषा, मधु आणि संपूर्ण जी टीम, तसेच एस्टोनिया आणि भारतातील कलाकार व तांत्रिक टीमचे आभार मानले. कोविडच्या कठीण काळात जर टीमने मनापासून मेहनत केली नसती तर ही फिल्म कधीच शक्य झाली नसती, असंही राणी मुखर्जी म्हणाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारानंतर आभार मानत राणी म्हणाली, ही फिल्म आणि हा क्षण माझ्या हृदयात कायम खास राहील. राणीने हा सन्मान जगातील सर्व मातांना अर्पण केला आहे.

अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी

मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे ही कथा मला मनापासून भिडली कारण ती एका प्रवासी आईच्या न थांबणाऱ्या लढ्याची कहाणी आहे. जी आपल्या मुलासाठी प्रत्येक संकटाचा सामना करते. आई म्हणून हा रोल माझ्यासाठी खूप वैयक्तिक होता. या फिल्मच्या माध्यमातून आम्ही मातृत्वाच्या शक्तीला सन्मान द्यायचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं की, ही फिल्म दररोज स्त्रियांच्या अंतर्मनात असलेल्या अपार ताकदीची आठवण करून देईल.

follow us