विश्वचषक 2023 च्या (World cup 2023) अंतिम सामन्यासाठी संपूर्ण देश उत्सुक झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना होणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे. उद्या (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूड आणि साऊथ सेलेब्सही खूप उत्सुक आहेत. (Actress Rekha Bose has announced that she will “streak on the beach of Visakhapatnam if India wins world cup 2023)
अशात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा बोजने भारत जिंकल्यास मोठी घोषणा केली आहे. बोज हिने इंस्टाग्रामवर “वर्ल्ड कप 2023” संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात “भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी विशाखापट्टनमच्या बीचवर स्ट्रीक करणार” अशी घोषणा केली आहे. ‘स्ट्रीकिंग’ ही गोष्ट आजपर्यंत केवळ परदेशात पाहायला मिळाली आहे. यात कोणत्याही खेळात मोठा विजय मिळाल्यास आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कपड्यांशिवाय धावले जाते.
अभिनेत्री रेखा बोजच्या पोस्टवर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, ‘मग तयार व्हा. भारत नक्कीच जिंकेल! तर अनेकांनी रेल्वे तिकीट बुक करु का? असा प्रश्न विचारला आहे. काहींनी बीचवर पैसे घेतले जातील असेही म्हंटले आहे. एकाने त्यांच्या घोषणेला चांगलेच ट्रोल केले आहे. हे सगळं तु केवळ प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी करत आहेस, टीम इंडियाच्या नावाने बकवास काहीतरी बोलत आहेस, असे म्हंटले आहे.
रेखा बोज ही तेलुगू चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिने ‘मंगल्यम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलेलो’ आणि ‘कालाई तस्मै नमः’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि इन्स्टाग्रामवर अनेकदा पोस्ट शेअर करत असते. अभिनयासोबतच ती त्याच्या बोल्ड अभिनयासाठीही ओळखली जाते. पण या अजबच घोषणेमुळे रेखा बोज आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या घोषणेमुळे पुनम पांडेचीही आठवण झाली आहे.
2011 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. पण त्यावेळी सामन्यापूर्वी जर टीम इंडियाने आयसीसी 2011 चा वर्ल्ड कप जिंकला तर ती आपले कपडे काढेल, अशी घोषणा केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात तिची चर्चा झाली होती. त्यानंतरही पूनम पांडे अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली. ती 2013 साली आलेल्या नशा चित्रपटात झळकली होती.