अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लूक चर्चेत! भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार…

चित्रपटसृष्टीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे एक नव्या भूमिकेत झळकणार असून तिचे भगवान श्रीकृष्णाच्या वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहे.

Sanskruti Balgude

Sanskruti Balgude

Sanskruti Balgude : आपला अभिनय, फॅशन आणि फोटोशूटमुळे कायमच चर्चेत राहिलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा एक नवा लूक चांगलाच चर्चेत आलायं. चित्रपटसृष्टीत संस्कृती एक नव्या भूमिकेत झळकणार असून तिचे भगवान श्रीकृष्णाच्या वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहे.

..तर मला ते आठवत नाही; डॉक्टर तरुणीच्या फोन कॉलबाबत रणजीतसिंह निंबाळकरांनी काय दिल स्पष्टीकरण?

संस्कृती अभिनयाच्या सोबतीने उत्तम क्लासिक नृत्य करते हे सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहून ती अनेक व्हिडिओ फोटो शेअर करताना दिसते नुकताच तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संस्कृती कृष्णाच्या रुपात दिसत आहे.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मित्राच्या फार्म हाऊसहून दुसरा आरोपी बनकर अटकेत

भगवान श्री कृष्णाच्या रुपात असलेली संस्कृती आणि तिच्या या नव्या लूकच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात. हा खास लूक तिने कुठल्या गाण्यासाठी केला का ? किंवा चित्रपटासाठी केला असावा हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

तिचं हे रूप बघून इंडस्ट्री मधल्या अनेक कलाकार मंडळीने तिचं कौतुक केलं आहे. अनेकांनी काय नवीन प्रोजेक्ट? असं देखील विचारल आहे. संस्कृतीचा हा नवा लूक खूप कमाल असून ती नक्की काय नवीन करणार? याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

ब्रेकिंग! आता मच्छिमारांनाही मिळणार वीज सवलत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…

दरम्यान, वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी संस्कृती या कृष्ण रुपात प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतेय. तिच्या या रूपाच कोड लवकरच उलगडणार का ? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Exit mobile version