Adipurush: फ्लॉप की हिट? जाणून घ्या आदिपुरुष सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई

Adipurush Movie: अभिनेता प्रभास, सैफ अली खान व क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असणारा आदिपुरुष (Adipurush Movie) या सिनेमाला ट्रॉलिंग आणि विरोध असतानाही या सिनेमाची ओपनिंग जबरदस्त झाली आहे. (Om Raut) हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपयांची […]

Adipurush Review

Adipurush Review

Adipurush Movie: अभिनेता प्रभास, सैफ अली खान व क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असणारा आदिपुरुष (Adipurush Movie) या सिनेमाला ट्रॉलिंग आणि विरोध असतानाही या सिनेमाची ओपनिंग जबरदस्त झाली आहे. (Om Raut) हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. परंतु हा सिनेमा चांगलच वादात सापडला आहे, तरीदेखील दुसऱ्या दिवशी या सिनेमाने मोठा धुमाकूळ घातला आहे.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी खराब VFX या सिनेमातील भाषेला विरोध करत सिनेमाला ट्रोल केल आहे. पण या उलट काही प्रेक्षकांना असंही वाटत आहे की, प्रभासने त्याच्या भूमिका उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.या सिनेमाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपये कमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आदिपुरुष या हिंदी सिनेमाने 36 कोटी, तेलगू सिनेमाने 48 कोटी, मल्याळम सिनेमाने 0.40 कोटी, तमिळ सिनेमाने 0.70 कोटी तर कन्नड सिनेमाने 0.4 कोटी इतकी कमाई केली आहे.

Adipurush: सिनेमात भाव खाऊन जातेय ही मराठमोळी अभिनेत्री, म्हणते “जे आयुष्यात कधी केलं नाही…”

देशात बॉक्स ऑफिसचे एकूण कलेक्शन 85.8 कोटींची मोठी कमाई झाली आहे. सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या दिवशी असे चित्र दिसून आले आहे की, सिनेमाची मोठी कमाई सुरू आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिपुरुषने रिलिच्या दोन दिवसातच जागतिक स्तरावर 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या सिनेमाने हिंदीमध्ये 37 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण ही आकडेवारी अंदाजे असल्याचे सांगितले आहे.

‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल

‘आदिपुरुष’ या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 200 कोटींची टप्पा गाठला आहे. आदिपुरुष हा सिनेमा 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला बिग बजेट सिनेमा आहे. गेल्या २ वर्षांच्या कालावधीत या सिनेमाला अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आणि मोठे वाद देखील झाले आहेत.

Exit mobile version