Adipurush Twitter Review: कसा आहे ‘आदिपुरुष’सिनेमा? पहिला शो बघितल्यानंतर प्रभासबद्दल ट्विटर युजर्स म्हणाले…

Adipurush latest update : ओम राऊत दिग्दर्शित (Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला आहे. आणि सकाळपासूनच सिनेमागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ सिनेमा अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. Watched #AdipurushHindi FDFS #ThreeWordReview JAI SHREE RAM⭐⭐⭐⭐ 4/5👍👍Brilliant story, […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T162539.849

Adipurush

Adipurush latest update : ओम राऊत दिग्दर्शित (Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला आहे. आणि सकाळपासूनच सिनेमागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ सिनेमा अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या सिनेमाची चाहत्यांना खूप दिवसांपासून मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अनेक वाद आणि बदलांनंतर अखेर त्यांना हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला मिळत आहे. दक्षिणेतील तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) या सिनेमाचे पहाटे ४ वाजताचे शो विकले गेले आहेत.

अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झाले आहेत तर कुठे वेटिंग वर आहेत. प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट पाहत आहे. पण हे चित्र अलीकडेच बदलले आहे.

कारण या चित्रपटावर टीजर पाहून अनेक टीका झाल्या होत्या. अक्षरशः हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी घोषणा देण्यात आली होती. चाहते ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या माध्यमातून प्रभासचे पुनरागमन साजरे करत आहेत. पहाटेचे शो बघितलेल्या चाहत्यांनी ट्विटरवर या सिनेमाचे रिव्ह्यू दिले आहेत. त्यांनी सिनेमाला आधुनिक रामायण असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात प्रभासच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत.

अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाला जज करण्यापेक्षा त्याचं कौतुक करायला हवं, असे देखील म्हटलं आहे. एकूणच चाहत्यांच्या प्रतिक्रिया बघता त्यांना प्रभासचा हा सिनेमा आवडल्याचे दिसून येत आहे. तर काही युजर्सच्या मते, आदिपुरुष ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. तर, प्रभासच्या लूकला ट्रोल करणाऱ्यांना देखील चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित (Directed by Om Raut) सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये टू डी आणि थ्रीडी मध्ये रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये दिसून आले आहेत. यामध्ये सनी सिंगने लक्ष्मणाची तर देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Exit mobile version