Adipurush Controversy : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा देशभरात जोरदार चर्चेत आला आहे. कुठे या सिनेमावर टीका, विरोध होत आहे. तर कुठे तोडफोड देखील करण्यात येत आहे. आता पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील (Nalasopara) एका सिनेमागृहामध्ये ‘आदिपुरुष’चा शो हिंदू संघटनांनी बंद पाडला आहे. (Adipurush Movie) नालासोपारा येथील एका सिनेमागृहामध्ये १८ जून २०२३ दिवशी आदिपुरुष सिनेमाच्या एका शोचं आयोजन करण्यात आले होते.
#WATCH | Maharashtra | Members of a few Hindu organisations created a ruckus at a multiplex in Nalasopara, Palghar on Sunday, 18th June while the film #Adipurush was being screened there. The protesters stopped the screening of the film, raised slogans and entered into a verbal… pic.twitter.com/b7BBDKPigm
— ANI (@ANI) June 19, 2023
यावेळी काही हिंदू संघटनांनी (Hindu organization) सिनेमागृहामध्ये मोठा गोंधळ घातला आहे. या आंदोलकांनी सिनेमाचे प्रदर्शन देखील थांबवले आहे. घोषणाबाजी करत सिनेमागृहात कर्मचाऱ्यांबरोबर मोठा वाद घातला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आंदोलक म्हणत आहेत की,”आमच्या देवाचा अपमान झाला आहे, आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का?, आमच्या देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार, फासावर चढावं लागलं, तरी चालेल पण अपमान सहन करणार नाही.
तसेच त्यांनी बॉलिवूड विरोधामध्ये मोठं मोठ्या घोषणा देखील दिल्या आहेत. आंदोलक गोंधळ घालत असतानाच सिनेमागृहातील एक व्यक्ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आला आहे. पण या आंदोलनकर्त्यांनी त्यांचे काही देखील न ऐकता गोंधळ हा सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. देशभरातून ‘आदिपुरुष’ सिनेमाला विरोध होत आहे. आता महाराष्ट्रातील हिंदू संघटना देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच तो चर्चेत आला आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड सोडली जात आहे.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र यशस्वी ठरला आहे. आता या सिनेमावर होत असलेला विरोध लक्षात घेत आणि चाहत्यांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांनी या सिनेमामधील वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार असल्याचे जाहीर केले आहे. टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती आल्याचे सांगितले जात आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमातील रावणाची भूमिका, हनुमानाच्या भूमिकेकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु, सिनेमामध्ये रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा बघून कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली आहे. तसेच हा सिनेमा अतिभव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बघताना चाहते मात्र नाराज झाले असल्याचे दिसून येत आले आहेत.