Download App

Aflatoon: सिद्धार्थच्या कॉमेडीचा धमाकेदार ‘अफलातून’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित!

Aflatoon: ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी सिनेमा येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. (Aflatoon Marathi Movie ) या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ‘अफलातून’ या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा आणि रेशम टिपणीस या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहेत.


या सिनेमाचा धमाल टीझर आज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ जाधवने ‘अफलातून’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला, घेऊन आलो आहोत अफलातून कॉमेडीचा धमाकेदार टीझर ! अफलातून हा मराठी सिनेमा २१ जुलैपासून फक्त चित्रपटगृहात. श्री, आदी आणि मानव या ३ डिटेक्टिव्ह मित्रांची रंजक गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे हाती घेतात.

ही मदत करत असताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करत असतात, याची रंजक कथा ‘अफलातून’ या सिनेमात  बघायला मिळणार आहे. ‘अफलातून’ सिनेमाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी स्वर दिले आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी या सिनेमाची धुरा सांभाळली आहे. सिनेमाच्या संगीताचे हक्क सारेगमकडे आहेत.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. सिद्धार्थ जाधवने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे. आपल्या हटके स्टाईलने आणि नृत्यशैलीने सिद्धार्थ जाधव चाहत्यांची नेहमी मनं जिंकत असतो. सिद्धार्थच्या दे धक्का, जत्रा, दे धक्का-2, टाइम प्लिज, लोच्या झाला रे’ अशा मराठी सिनेमानं चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. सिद्धार्थने मराठी सिनेमाबरोबरच हिंदी सिनेमामध्ये देखील काम केले आहे. अभिनेता रणवीर सिंहबरोबर सिद्धार्थन सिम्बा या सिनेमामध्ये काम केले आहे. आता सिद्धार्थच्या ‘अफलातून’ या आगामी सिनेमाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us