Download App

Article 84 : ‘पिंक’ नंतर बिग बी दिसणार पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत

मुंबई :’नो मीन्स नो!’- ‘पिंक’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा हा डायलॉग प्रेक्षक अजूनही विसरलेले नाही. या चित्रपटात महिला सक्षमीकरणावर लक्ष वेधण्यात आलं होत. त्यानंतर आता सात वर्षांनंतर अमिताभ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कोर्टरूममध्ये परतणार आहे. दिग्दर्शक रिभु दासगुप्ता यांच्या नव्या चित्रपटात बिग बी मुख्य भूमिकेत असणार आहेत या चित्रपटाचं नाव ‘सेक्शन 84’ असं आहे.

बुधवारी ट्विटरवर या चित्रपटाची घोषणा करताना अमिताभ यांनी लिहिलं की, ‘पुन्हा एकदा या सर्जनशील लोकांना एका नवीन उपक्रमात सामील करत आहोत. मी नवीन आव्हानासाठी तयार आहे.’ तर दिग्दर्शक रिभु दासगुप्ता यांनी या ट्विटला उत्तर दिले की, ‘सर, तुमच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी धन्य आहे.’

Sushmita Sen Heart Attack : अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदय विकाराचा झटका, इन्स्टाग्रामवर दिली माहिती

हा एक थ्रिलर चित्रपट आहे. मात्र अजून या चित्रपटाच्या कथेबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. चित्रपटाच्या नावावरून तो भारतीय दंड संहितेच्या कलम 84 बद्दल असल्याची कल्पना येते. हे कलम मानसिक रूप आजारी व्यक्ती कायद्याने दोषी नसतो. जर तो अनावधाने गुन्हा घडला तर. त्यामुळे हाल चित्रपट त्यासंदर्भात असण्याची शक्यता आहे.

Tags

follow us