Sushmita Sen Heart Attack : अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदय विकाराचा झटका, इन्स्टाग्रामवर दिली माहिती

Sushmita Sen Heart Attack : अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदय विकाराचा झटका, इन्स्टाग्रामवर दिली माहिती

मुंबई : सुष्मिता सेनने तिच्या चाहत्यांना धक्कादायक बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तिला ह्रदय विकाराचा झटका आला होता. ही माहिती तिने आज तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. सुष्मिताने लिहिले की, तिची एंजिओप्लास्टी झाली आहे. तसेच ती आता एकदम ठीक आहे. दैनंदिन जीवनात ती पुन्हा सक्रिय झाली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

या पोस्टमधअये तिने लिहिले की, तुम्ही आनंदी आणि धैर्यवान रहा आणि ह्रदयाची काळजी घ्या. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तेथे असेल शोना, हे शहाणपणाचे शब्द माझ्या वडिलांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे…स्टेंट टाकण्यात आले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञाने मला सांगितले की माझे हृदय मोठे झाले आहे.

VT 13 : ‘या’ चित्रपटातून वरुण तेज करणार बॉलिबूडमध्ये पदार्पण

सुष्मिता सेनचं वय 47 वर्ष आहे. 2021 मध्येही तिची एक सर्जरी झाल्याचं तिने सांगितलं होत. तिच्या बर्थडेला एक व्हिडिओ शेअर करत तिने ही माहिती दिली. सर्व काही ठीक असून ती बरी होत आहे. माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये तिला एडिसन रोग झाल्याचे निदान झाले होते. या आजाराशी सुष्मिताची लढाईही खूप तणावपूर्ण होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube