VT 13 : ‘या’ चित्रपटातून वरुण तेज करणार बॉलिबूडमध्ये पदार्पण

मुंबई : अभिनेता वरुण तेज व्हिटी 13 या चित्रपटातून बॉलिबूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये तो एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. तेजला त्याच्या भूमिका आणि कथानक निवडीसाठी ओळखल जातं. हरीश शंकर दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट गड्डालकोंडा गणेश आणि थोली प्रेमा, फ़िदा, F2, F3 यासांरख्या अनेक हिट चित्रपटांमुळे चाहते त्यांच्यावर प्रेम करतात.
हवाई दलाच्या सन्मानार्थ, अभिनेता वरुण तेज कोनिडेलाने त्याच्या सोशल मीडिया डिस्प्लेचा फोटो बदलून लाइट कॉम्बॅटता फोटो लावला आहे.सत्य घटनांवर आधारित, हा अनटाइटल्ड चित्रपट एक देशभक्तिपूर्ण चित्रपट आहे. अद्याप या चित्रपटचं नाव ठरलेलं नाही. ज्यामध्ये चित्रपटाचा नायक समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना येणार आहे. कारण यामध्ये भारताने आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या भीषण हवाई हल्ल्यांपैकी एक हल्ला दाखवण्यात आला आहे. वरुणने ट्विटरवर भारतीय हवाई दलाच्या सोशल मीडिया हँडललाही फॉलो करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्या पुढाकारामुळे ही मोहीम पुढील स्तरावर नेण्यात मदत झाली आहे.
Pathan : शाहरूखच्या पठानची पाचव्या बुधवारीही शानदार कामगिरी
दिग्दर्शक प्रवीण सत्तारू यांनी सांगितलं की, हा एक अॅक्शन चित्रपट आहे. यामध्ये वरुण तेज एक रोमांचक भूमिकेत दिसणार आहे. VT13 वरुण तेजसाठी एक नवीन प्रोजेक्ट आहे कारण तो F3: फन अँड फ्रस्ट्रेशन: फन आणि फ्रस्ट्रेशनपासून त्याने आतापर्यंत न केलेली भूमिक शोधत होता. त्याचबरोबर तो प्रवीण सत्तारू यांच्या चित्रपटात बॉडीगार्डच्या भूमिकेत दिसणार आहे.