Pathan : शाहरूखच्या पठानची पाचव्या बुधवारीही शानदार कामगिरी

Pathan : शाहरूखच्या पठानची पाचव्या बुधवारीही शानदार कामगिरी

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1024.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. पाचव्या बुधवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार कमाई केली.

पठाणने आता एकट्या परदेशात $46.93 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतातील नेट कलेक्शन 528.12 कोटी एवढे आहे. पठाण सिनेमाची जगभरातील एकूण कमाई 1024.50 कोटी आहे. यापैकी भारतात 639 कोटी तर परदेशात 385.50 कोटी रुपये या सिनेमाने कमावले आहेत.

SEBI Action : अर्शद वारसीसह पत्नी आणि मेहुण्यावर सेबीची कारवाई, अशी करत होते फसवणूक

या सिनेमामध्ये बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत आहे. तर दीपिका पदुकोन, जॉन अब्राहम हे दोन कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या सुरुवातीला बराच वाद झाला होता. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमात बदल करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube