घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेकीसह राहतेय माहेरी

Aishwarya Rai Bachchan Moved Out Of The Bachchan House: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत.   View this post on Instagram   A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) मीडिया रिपोर्ट्सवर ऐश्वर्या राय आणि […]

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेकीसह राहतेय माहेरी

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेकीसह राहतेय माहेरी

Aishwarya Rai Bachchan Moved Out Of The Bachchan House: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सवर ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. बिग बी देखील (Amitabh Bachchan) त्यांच्या पोस्ट्स सतत शेअर करत आहेत, यामुळे त्यांच्या मतभेदाच्या बातम्यांना वाव मिळत आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीने बच्चन हाऊस सोडल्याची बातमी समोर आली आहे. मुलगी आराध्यासोबत जलसा येथून तिच्या माहेरच्या वृंदा राय बंगल्यात शिफ्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होणार नाही!

‘झूम’च्या रिपोर्टचा हवाला देत बातमीत असं म्हटलं जात आहे की, ऐश्वर्या रायने बच्चन जलसा हाउस (Jalsa House) सोडला आहे. मात्र, ती तिची आई वृंदा राय आणि पती अभिषेक बच्चन यांना समान वेळ देत असल्याचे बोलले जात आहे. तिने नुकतचं बच्चन हाऊस जलसा सोडला असून पतीसोबत राहत असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात मतभेद सुरू आहेत, यामुळे त्यांच्या कुटुंबात वादाची ठिणगी निर्माण झाली आहे. जलसामध्ये श्वेता बच्चन कायमची शिफ्ट झाल्यामुळे भांडण वाढल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नसल्याचा दावाही वृत्तांत केला जात आहे.

हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; दीपिका झळकली रोमँटिक अंदाजात

‘द आर्चीज’च्या स्क्रिनिंगमध्ये ऐश्वर्या पतीसोबत दिसली

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नुकतचं ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये एकत्र दिसले होते. दोघांनीही मुलगी आराध्यासोबत एकाच फ्रेममध्ये पोज दिली. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अभिनेत्री तिच्या आई आणि मुलीच्या खूप जवळ होती. यावेळी बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांच्यात काहीतरी बरोबर नसल्याचा अंदाज बांधला जात होता.

Exit mobile version