हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; दीपिका झळकली रोमँटिक अंदाजात

 हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; दीपिका झळकली रोमँटिक अंदाजात

Fighter Sher Khul Gaye Song Release: चाहते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone)यांच्या आगामी एरियल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ ची (Fighter Movie) आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

‘फायटर’चे पहिले गाणे ‘शेर खुल गए’ रिलीज

टीझरनंतर आता ‘शेर खुल गए’ (Sher Khul Gaye Song) या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात दीपिका आणि हृतिकची केमिस्ट्री बघायला मिळत आहे. दोघांच्या डान्स मूव्हजही अप्रतिम आहेत. हे गाणे रिलीज होताच खूप व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा हृतिक रोशन आपल्या डान्सने चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. दीपिकाही त्याच्यासोबत गाण्याच्या लयशी जुळवून मस्त नाचताना दिसत आहे.

हे गाणे विशाल-शेखर, बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी गायले आहे, तर विशाल-शेखरने ते संगीतबद्ध केले आहे. त्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. हृतिक आणि दीपिकावर चित्रित केलेला हा आकर्षक ट्रॅक ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला नाचण्यापासून रोखू शकणार नाही.

हृतिक आणि दीपिकाची भूमिका दमदार

टीझरबद्दल बोलायचं झालं तर फायटरचा टीझर संपूर्ण अॅक्शनपॅक आहे. 1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार लूकमुळे चाहते घाबरले आहेत. लष्कराचा गणवेशात तिन्ही कलाकार हलक्या अंदाजात दिसत आहेत, आणि वरचेवर त्यांचे हवाई स्टंट पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत. चित्रपटात दीपिका आणि हृतिक फायटर जेटमध्ये बसून एरियल अॅक्शन करताना दिसत आहेत. या चित्रपटाद्वारे हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

‘या’ दिवशी होणार रिलीज

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’मध्ये एकत्र काम केले आहे. फायटर हा हृतिक रोशनचा पहिला 3D चित्रपट आहे, ज्याबद्दल तो खूप उत्सुक आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube