Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली

Cannes 2023: प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी मोठी उत्सुकता होती. अखेर 16 मेपासून सुरु झालेल्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T102319.148

Aishwarya Rai Bachchan

Cannes 2023: प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी मोठी उत्सुकता होती.

अखेर 16 मेपासून सुरु झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या अंदाजामध्ये दिसून आली आहे. यावेळी ऐश्वर्याने आपला स्टाईल स्टेटमेंट पूर्णपणे वेगळा ठेवला होता. ऐश्वर्याने काळ्या गाऊनबरोबर मोठा सिल्व्हर हुड कॅरी केला होता. ऐश्वर्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.


कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 ते 27 मे दरम्यान चालणार आहे. यादरम्यान अनेक भारतीय सेलिब्रिटी या फेस्टिव्हलला मोठी हजेरी लावत आहेत. मात्र सर्वांच्या नजरा ऐश्वर्या रायकडे लागले होते. ऐश्वर्याचे चाहते तिच्या रेड कार्पेट लूकची आतुरतेने वाट बघत होते. अखेर कान्समधून ऐश्वर्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लुक बघून चाहत्यांनी तिला प्रोत्साहन देखील दिले आहे तर काहींनी तिची जोरदार खिल्ली उडवली आहे.

ऐश्वर्याने यंदा आपल्याला निराश केल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणं आहे. ‘इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला ऐश्वर्या पोहोचली होती. ऐश्वर्या राय कान्ससाठी प्रत्येक वेळी फॅशनबाबत सतत नवनवीन प्रयोग करत असते. यावेळी देखील तिने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तिने काळ्या रंगाचा सोफी कॉचर गाऊन परिधान केला होता.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यासह तिने तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून एक मोठा चांदीचा हुड देखील परिधान केला होता. या हुडमध्ये हलके अल्युमिनियम वापरण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे आपले केस उघडे ठेवले होते. परंतु ऐश्वर्याचा हा लूक फेल ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे. कन्समधून ऐश्वर्या रायचे फोटो समोर येताच चाहत्यांनी जोरदार कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

एकाने कमेंट करत लिहले आहे की, ‘या अभिनेत्रींना झालंय तरी काय? फॅशन म्हणून काही देखील करत आहेत’. तर दुसऱ्या यूजरने लिहले आहे की, ‘नॉर्मल का काही घालू शकत नाहीत हे लोक? विचित्र दिसणं गरजेचं आहे का?’, तर तिसऱ्या एकाने लिहलंय, ऐश्वर्याचा हा लूक पूर्णपणे फसला आहे. तर काहींनी अभिनेत्रीच्या हेअरस्टाईलची जोरदार खिल्ली उडवली आहे. कितीदिवस एकच हेअरस्टाईल कॅरी करणार आहेस? काहीतरी नवीन कर असा सल्ला चाहत्यांनी तिला यावेळी दिला आहे.

Exit mobile version