Aishwarya Rai Deepfake Video: सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे.गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सारा तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात आता अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनचाही डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याचा चेहरा वापरुन एक मुलगी चक्क डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय दिसत आहे. या व्हिडीओत सुरुवातीला ऐश्वर्या जीन्स-शर्ट घालून डान्स करत आहे. त्यानंतर ती साडी नेसून डान्स करत असल्याचे बघायला मिळत आहे. तर बॅकग्राऊंडला बॉलिवूडचा भाईजानचे ‘टायगर ३’ सिनेमातील ‘लेके प्रभू का नाम’ हे गाणे वाजत असल्याचे दिसत आहे. ऐश्वर्या भाईजानच्या व्हिडीओवर डान्स करते हे बघून अनेकांना आनंद झाला आहे. परंतु हा व्हिडीओ फेक असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडीओ बघितला तर ऐश्वर्याचा चेहरा एडिट करून लावण्यात आला आहे. तसेच व्हिडीओमधील एक मुलगी दुसऱ्या कुठल्या तरी गाण्यावर जोरदार डान्स करत असल्याचे बघायला मिळत आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करत त्या मुलीचा चेहरा आणि बॅकग्राऊंडमधील गाणे बदलण्यात आले आहे. हा व्हिडीओ बघून सर्वाना आश्चर्यचा मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी असे व्हिडीओ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.
Katrina Kaif Deepfake Photo: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ डीप फेकच्या जाळ्यात!
डीप फेक हा एक सिंथेटीक मीडियाचा प्रकार आहे. याच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्तीचा चेहरा बदलण्यात येतो. डीप फेकमध्ये खास करुन आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेक असल्याचे कधीही कळत नाही. अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्याच समन्वय नसणे यातून डीप फेक व्हिडीओ ओळखता येतात. मात्र हे व्हिडीओ बघून आता कलाकारांसोबतच सर्वसामान्य देखील चिंता व्यक्त करत आहेत. असे डीपफेक व्हिडीओ करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.