मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, व्हायरल व्हिडीओनंतर स्पष्टीकरण

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, व्हायरल व्हिडीओनंतर स्पष्टीकरण

औरंगाबाद : चार दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचं (Students Protest)पुण्यात (Pune)आंदोलन (Movement)सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू विचारली, त्यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ (Video)सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते औरंगाबादमध्ये (Aurangabad)माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना मी अनावधानानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा शब्द उच्चारला. दिवसभर कोर्टकचेरी, निवडणूक आयोगाच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळं चुकून माझ्या तोंडून निवडणूक आयोग असा शब्द निघालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

School Admission : देशात सहा वर्षांच्या बालकांनाच शाळेत प्रवेश मिळणार

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल मी एमपीएसीला दोनदा पत्र लिहिलंय. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबद्दल आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेतलाय. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे, तीच सरकारचीही भूमिका आहे. मी पुन्हा याबाबत आयोगाशी बोलणार आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube